News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ यांचे कृषिवनशेती केंद्र, कृषि महाविद्यालय, नागपुर

Updated on 21 September, 2022 3:31 PM IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ यांचे कृषिवनशेती केंद्र, कृषि महाविद्यालय, नागपुर यांच्या वतीने दि. १९.०९.२०२२ ला जागतिक बांबु दिनाचे निमीत्ताने चर्चासत्र व शिवार फेरिचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. चारुदत्त मायी, माजी अध्यक्ष कृषि शास्त्रज्ञ भरती मंडळ, नवि दिल्ली यांचे अध्यक्षतेत, डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक, डॉ. एस रमेशकुमार, वनसंरक्षक, सामाजिक वनिकरण, डॉ. के. डी.

ठाकुर, डॉ. ययाती तायडे सहयोगी अधिष्ठाता, यांचे प्रमुख उपस्थितीत व डॉ. विजय इलोरकर, प्रकल्प प्रमुख यांचे नियोजनात यशस्वीरित्या पार पडले. Dr. Vijay Ilorkar, Project Head, successfully executed the planning.

हे ही वाचा - असे करा नागअळी चे व्यवस्थापन वाचेल मोठी मेहनत

बांबु लागवडीसाठी उच्च प्रतिचे रोपे तयार करुन शेतकऱ्यास उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे डॉ. मायी यांनी सुचना केल्यात.चर्चासत्रात बांबु शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी तसेच उद्योजक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. चर्चासत्रात बांबु नर्सरी, लागवड, कापणी, बांबु

आधारित उद्योग, बांबुची विक्री व्यवस्था यावर सखोल चर्चा झाली. चर्चासत्रात श्रीमती गिता नन्नावरे, विभागीय वनअधिकारी, डॉ. विजय करडभाजने, डॉ. अमित अग्रवाल, डॉ. आशिष नागपुरकर, डॉ. प्रशांत राऊत, डॉ. विनोद राऊत यांनी बांबु लागवड व प्रक्रिया या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात श्री. रमेश डुमरे, श्री. निखील घुगल, श्री. समीर पोतकिले,

श्री. आशिष कसावा, श्री. राजेंद्र जगताप या बांबु लागवड केलेल्या प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.चर्चासत्राचा समारोप डॉ. भरतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपुर व डॉ. राजेंद्र काटकर, विभाग प्रमुख कृषिरसायनशास्त्र, कृषि महाविद्यालय, नागपुर यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रशांत राऊत, श्री. मिलींद रामटेके, श्री अजय पोफळे, श्री. राहुल मेश्राम यांनी परिश्रम घेतले.

English Summary: World Bamboo Day organized at College of Agriculture, Nagpur
Published on: 21 September 2022, 02:58 IST