नाशिक : नाशिक जिल्ह्याला शुक्रवारी अवकाळी पावसाने जोडपले. वादळी वाऱ्यासाह आलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. दरम्यान, सिन्नर तालुक्यात रामपूर जवळील पुतळेवाडी परिसरात वीज कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. ही महिला कपडे काढण्यासाठी बाहेर पडली असता काळाने तिच्यावर घाला घातला.
वैशाली विजय कवडे असे वीज पडून ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पती व सासू असा परिवार आहे. नाशिकसह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे.
या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर अनेक घरांचे देखील नुकसान झाले. वीज कोसळण्याच्या घटना देखील काही ठिकाणी घडल्या.
मुंबई-पुणे मार्गावर बस दरीत कोसळली, भीषण अपघातात 12 ठार
सिन्नर तालुक्यातील रामपूर पुतळेवाडी येथे झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वैशाली कवडे या घराच्या अंगणातील लिंबाच्या झाडाजवळ वाळत टाकलेले कपडे काढण्यासाठी गेल्या होत्या.
मात्र, त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्याने वैशाली यांनाही विजेचा जोरदार झटका बसला. नातेवाईकांनी त्यांना मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published on: 15 April 2023, 09:44 IST