जे शेतकरी पीक कर्जाची नियमित परतफेड करत असतील अशा शेतकऱ्यांना आता तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. एक लाख ते तीन लाखांच्या कर्ज मर्यादेत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास ही सवलत देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तीन लाखांपर्यंत चे पिक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याची घोषणा केली होती.
या झालेल्या निर्णयामुळे राज्य सरकारची व्याजदर सवलत तीन टक्के आणि केंद्र शासनाकडून मिळणारी तीन टक्के व्याज सवलत या दोन्ही सवलतींचा एकत्र फायदा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होणार आहे. डॉ.. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते.
या संबंधित योजनेत अल्पमुदत पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये कर्ज मर्यादेपर्यंत तीन टक्के व्याज सवलत देण्यात येत होती. एक लाख ते तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेपर्यंत व्याजदरात एक टक्का सवलत देण्यात येत होती. आता नवीन निर्णयानुसार एक ते तीन लाख रुपये कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास त्यांना व्याजदरात आणखी दोन टक्के सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी यासाठी करता येणार आहे. यातून शेती उत्पादनात वाढ होईल. तसेच व्याज सवलत मिळण्यासाठी शेतकरी पीक कर्जाची मुदतीत परतफेड करतील. त्यामुळे बँकांची वसुली वाढ होऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
Published on: 16 June 2021, 10:10 IST