अलिकडच्या काळात प्रत्येक क्षेत्रात छोट्या छोट्या कामांसाठीही तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांचे जीवन सुखकर होण्यास मदत झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील बदलांनी तर सर्वसामान्यांना टेक्नोसॅव्ही केले आहे. आरबीएल बँकने याच दिशेने नवे पाऊल टाकत मोबाईल अॅपद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा आपल्या ग्राहकांना देऊ केली आहे.खाजगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या आरबीएल बँकेने ग्राहकांना एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढता येण्यासाठी ही नवीन सुविधा निर्माण केली आहे.
इन्स्टंट मनी ट्रान्सफर तंत्रज्ञानाचा फायदा घेत बँकेने एटीएममधून कार्डशिवाय ग्राहक पैसे काढू शकतील अशी सुविधा दिली आहे. त्यामुळे डेबिट कार्ड आपल्याजवळ नसले तरीही पैसे काढता येणार आहेत. या सुविधेसाठी आरबीएलने ग्लोबल फायनान्स टेक्नोलॉजी प्रोव्हायडर कंपनी एम पेमेंट सिस्टम सोबत करार केला आहे. याबाबत बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे ग्राहक आता आय. एम. टी. सर्व्हिस अंतर्गत देशभरातील बँकेचे 389 एटीएम आणि इतर बँकांच्या 40000 हजारापेक्षा जास्त एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकतील.
अशी आहे सुविधा
आरबीएल बँकेच्या 'मो बँक ॲप'मध्ये लॉगिन करून ग्राहक या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. लॉगिन केलेल्या ग्राहकांना आय एम टी सुविधा उपलब्ध असलेल्या एटीएममध्ये जावे लागेल. या एटीएममधून बँकेकडे रजिस्टर मोबाईल नंबरचा वापर करून किंवा ॲपद्वारे ग्राहकांना कार्डशिवाय पैसे काढता येतील.
Published on: 13 September 2020, 02:48 IST