बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतीवर झालेला आहे त्यासोबत शेतीच्या बऱ्याच जोडधंद्यावर सुद्धा वातावरणाचा परिणाम झालेला आहे. त्यातील एक म्हणजे मत्स्यव्यवसाय .वाढणारी कडाक्याची थंडी आणि ढगाळ वातावरण यामुळे इंदापूर कृषी बाजार समितीमध्ये मच्छी मार्केट मध्ये आवक घटली आहे. त्यामुळे माश्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कसा झाला मासळी बाजारावर परिणाम:-
रोजच्या बदलणाऱ्या वातावरणामुळे आणि थंडीमुळे मासेमारी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येत आहेत. त्यामुळे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माशांची आवक ही 30 पेक्षा जास्त टक्क्यांनी घटलेली आहे. त्यामुळे माश्यांच्या किमती मध्ये 30 ते 60 रुपयांनी वाढलेली आहे.वाढलेली कडाक्याची थंडी आणि ढगाळ वातावरण यामुळे मच्छी पकडण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मच्छी बाजारात 30 टक्यांनी आवक कमी झालेली आहे त्यामुळे माश्यांची किंमत सुद्धा 60 रुपयांपर्यंत वाढलेली आहे.
आवक घटल्यामुळे दरात वाढ:-
बाजारात मच्छी ची आवक घटल्यामुळ दरात वाढ झाली आहे. या पूर्वी बाजारात वांब 250 ते 350 रुपये प्रति किलो या भावात मिळत होती. परंतु आता 300 ते 500 रुपये या भावावर पोहचली आहे. तसेच चिलापी माश्याच्या भावात 20 ते 60 रुपयांपर्यंत वाढ झालेली दिसून येत आहे.
ग्राहकांच्या रांगा:-
आवक कमी झाल्यामुळे बाजारात मासळी कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे खरेदी साठी अनेक लोक बाजारात रांगा लावत आहेत. सोबत कमी मासळी येत असल्याने भाव सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
Published on: 19 November 2021, 06:58 IST