कृषी क्षेत्रात यांत्रिकरणानंतर आता तंत्रज्ञानांचा वापर होऊ लागला आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात अजून वाढ होईल. तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज येत असल्याने पिकांचे नुकसान कमी होण्यास मदत होते तर बाजारपेठात शेतमाल नेणे सोपे झाले आहे. रास्त भाव मिळवणेही शेतकऱ्यांना सोपे झाले आहे. दरम्यान कृषी क्षेत्र डिजिटल होत असल्याने अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या हातात आल्या आहेत. शेतकरी घरी बसून आपला शेत माल बाजारात विकू शकतो. तर शासकीय योजनांचाही पाठपुरावा करु शकतो. दरम्यान शेतकरी ऑनलाईन पद्धतीने बियाणांची खरेदी करु शकतो. Indian Horticultural Research Institute भारतीय बागवानी अनुसंधान संस्थानने देशातील बीज पोर्टल सुरु केले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी घरी बसून बियाणे मागवू शकतो. या पोर्टलवर ६० पिकांचे बियाणे उपलब्ध आहेत, यात टोमॉटो, कांदे, भेंडी, वांगे, मिर्ची, टरबूज, शिमला मिर्ची, वटाणे, पालक, कोथिंबिरी, आदी बियाणे आहेत. बीज पोर्टलचे भारतीय स्टेट बँकेच्या योनो कृषी एप सोबत करार झाला आहे. याचे लोकार्पण हे केंद्रिय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. यावेळी भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार उपस्थित होते. या दोन्ही एपच्या माध्यमातून कोट्यवधी शेतकऱ्यांना बियाणांसह शासकीय योजना आणि बँकेच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमावेळी केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, कृषी क्षेत्रात नेहमी आव्हानात्मक राहिले आहे. तरीही शेतकऱ्यांची मेहनत व शास्त्रज्ञांच्या संशोधन आणि सरकारी नीतींमुळे हे क्षेत्र देशातील सर्वाधिक महत्त्वाचे क्षेत्र बनले आहे.
देशाच्या खाद्यान्न मागण्यांसह संपूर्ण जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राची जवळपास लक्ष देणे आवश्यक आहे. जीडीपीतील योगदानाच्या दृष्टीकोनातून या क्षेत्राचे महत्त्व अधिक आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकार नेहमी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान पंतप्रधान उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारी सर्व सरकारी मदत गावागावात पोहोचवण्यास जोर देतात. कृषी मंत्री पुढे म्हणाले , जिथे जिथे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो तेथे ग्रामीण क्षेत्रापर्यंत पोहोचण्याचा मोठा फायदा होतो. ज्यामध्ये बँकांचे मोठे योगदान आहे आणि एसबीआयचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मग ते पंतप्रधान किसान योजना असो की कोरोना संकट फेरीमध्ये, जन धन खात्यात कोट्यवधी बहिणींना निधी देणे, शेतकरी आणि सरकारच्या इतर घटकांकडून पैसे देणे यासारख्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये बँक आणि तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
Published on: 28 August 2020, 04:59 IST