आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. मागच्या वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी ऊस लागवडीखालील क्षेत्र दुप्पट वाढले आहे. बहुतांशी गेल्या काही वर्ष्याच्या काळात शेतकरी ज्वारी बाजरी गहू इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे परंतु योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग ऊस शेतीकडे वळला आहे कारण हुकमी उत्पन्न हे फक्त ऊस लागवडीच्या माध्यमातून मिळू शकते.दर वर्षी च्या पेक्षा यंदा च्या वर्षी उसाचे क्षेत्र जरी जास्त असले तरी साखर कारखान्यांनी योग्य नियोजन लावले आहे आणि शेतकरी वर्गाला ऊस नेण्याची हमी सुद्धा दिली आहे. परंतु हे नियोजन चुकताना दिसत आहे. शेतकरी वर्गाचा बराच ऊस हा अजून फडताच असल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान:
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेतकरी वर्गाला आवाहन सुद्धा दिले आहे की, शेतकरी वर्गाने चिंता करू नये राहिलेला ऊस लवकरात लवकर कारखान्याला पाठवता येईल असे सुद्धा सांगितल. परंतु तरीसुद्धा अजून राज्यातील 20 ते 30 टक्के ऊस हा अजून फडातच आहे. यात कारखान्याचे नाही तर शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान आहे. कारण काळावधीपेक्षा जास्त दिवस ऊस शेतामध्ये राहिला तर ऊस पोकळ होऊन त्याचे वजन घटायला सुरुवात होते.
यंदा च्या वर्षी ऊस गाळपचा हंगाम जरी संपून गेला तरी ऊस रानातच उभा राहिला आहे. वजन घटून नुकसान होण्यापेक्षा शेतकरी वर्ग आता गुऱ्हाळा वर ऊस देऊ लागले आहेत. परंतु साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे की जो पर्यंत शेतातील सर्व ऊस जात नाही तोपर्यंत कारखाने बंद होणार नाहीत याची हमी सुद्धा दिली आहे. राज्यातील गाळप हंगाम अंतिम टप्यात आला तरी ऊस अजून बराच शिल्लक आहे कारण यंदा च्या वर्षी उसाचे उत्पन्न आणि क्षेत्र हे वाढल्यामुळे निजोजन फिस्कटले आहे.
तसेच अंदाजे एप्रिल महिन्यापर्यंत ऊस गाळप आणि कारखाने चालू राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उसाची योग्य वेळेत तोड झाली तर ठीक नाहीतर ऊस तोडणीचा कालावधी उलटून गेला तर उसाच्या वजनामध्ये 15 टक्के घट होऊन मोठया प्रमाणात नुकसान होते. या कारणामुळे शेतकरी विविध पर्याय शोधून यावर तोडगा काढत आहेत.
Published on: 07 March 2022, 10:30 IST