News

कापुस पिक सध्या फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत असुन मराठवाडयात मागील तीन आठवडयापासुन पावसाचा खंड पडला आणि त्यानंतर दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. त्याचा परीणाम असा झाला की, कापसामध्ये आकस्मिक मर दिसुन येत आहे. हा कुठला रोग नसुन कापसातील विकृति आहे. सतत 15 दिवस पाण्याचा ताण पडला आणि पाणी दिले किंवा पाऊस पडला तरी मर होते.

Updated on 30 July, 2019 5:46 PM IST

कापुस पिक सध्या फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत असुन मराठवाडयात मागील तीन आठवडयापासुन पावसाचा खंड पडला आणि त्यानंतर दोन दिवसात जोरदार पाऊस झाला. त्याचा परीणाम असा झाला कीकापसामध्ये आकस्मिक मर दिसुन येत आहे. हा कुठला रोग नसुन कापसातील विकृती आहे. सतत 15 दिवस पाण्याचा ताण पडला आणि पाणी दिले किंवा पाऊस पडला तरी मर होते.

प्रखर सुर्यप्रकाश किंवा सतत ढगाळ वातावरण यामुळे ही मर दिसते. जास्त पाणी झाले तरीही मर होते. या विविध कारणांपैकी एक कारण मर येण्यासाठी पुरेसा आहे. अशा परिस्थितीत कापुस पीक मुळावाटे अन्न घेवू शकत नाही. अन्नपुरवठा बंद झाल्यामुळे पीक मलूल होते व सुकल्यासारखे दिसते. यासाठी शेतकरी बंधुनी घाबरुन न जाता साधे सोपे उपाय करावेत.

प्रथमत: शेतामधून पाण्याचा निचरा करावा, जास्तीचे पाणी शेतातून काढून टाकावे त्यानंतर 15 ग्रॅम युरिया+15 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश+2 कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति लिटर पाण्यात टाकून चांगले मिसळून घ्यावे. हे द्रावण 100 ते 150 मि. ली. उमळलेल्या झाडाला टाकून आळवणी करावी. यामुळे पीकाला लगेच अन्नद्रव्य उपलब्ध होतील आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बुरशीनाशकाचा वापर करावा.

जसजसा वापसा होईल तसतसे पिकात सुधारणा होईल. जमिनीत हवा आणि पाण्याचे प्रमाण सारखे झाले की मुळे अन्न घ्यायला सुरुवात करतात आणि मर विकृती हळूहळू कमी होते, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे यांनी दिला.

English Summary: Wilt Disorders found in Cotton Crop Marathwada region
Published on: 20 August 2018, 11:06 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)