बिझनेस लाईनने ही बातमी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किटकनाशकांच्या प्रस्तावित बंदीवरील राजेंद्रन समितीच्या अहवालाबाबत कृषी मंत्रालय मंत्रिस्तरीय चर्चा करू शकते.
देशात २७ किटकनाशकांवर बंदी घालण्याच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीवर केंद्रीय कृषी मंत्रालय या आठवड्यात निर्णय घेण्याची शक्यता आहे. मात्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे यावर तातडीने निर्णय होईल की नाही, याबाबत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ शंका व्यक्त करत आहे.
केंद्र सरकारने मे २०२० मध्ये एक अधिसुचनेचा मसुदा प्रकाशित केला होता. ज्यामध्ये २७ किटकनाशकांवर बंदी घालण्याबाबत संबंधितांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. दरम्यान, भागधारकांनी केलेल्या विनंतीवरून आणि कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्तक्षेपामुळे हरकती आणि सूचना मागविण्याची मुदत ४५ दिवसांवरून ९० दिवसांपर्यंत वाढवण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक टी. पी. राजेंद्रन यांच्या नेतृत्त्वात कृषी मंत्रालयाने एका समितीची स्थापना करण्यात आली.
उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या २७ कीटकनाशकांचे सध्याचे उत्पादन मूल्य सुमारे दहा हजार ३०० कोटी रुपये असून यापैकी ५८ टक्के किटकनाशकांची निर्यात होते. जर या किटकनाशकांच्या देशांतर्गत विक्रीवर बंदी घातल्यास आयात केलेल्या पर्यायी किटकनाशकांसाठी दोन हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागतील, ज्याचा बोजा थेट शेतकऱ्यांवर पडणार आहे. केंद्रीय कृषी सचिवांनी गेल्याच आठवड्यात पदभार स्विकारला आहे. त्यामुळे त्यांना या विषयाचा नव्याने अभ्यास करण्यासाठी वेळ लागू शकतो.
दरम्यान, कृषी मंत्रालयाने आतापर्यंत देशात आयात, उत्पादन किंवा विक्रीसाठी ४६ कीटकनाशके आणि चार कीटकनाशकांच्या फॉर्म्युलेशनवर बंदी घातली आहे. तसेच पाच कीटकनाशकांच्या घरगुती वापरावर बंदी आहे, मात्र त्यांची निर्यात करण्याची परवानगी आहे आणि नऊ कीटकनाशके प्रतिबंधित वापराखाली आहेत.
बंदी घालण्यात येणारी किटकनाशके: अॅसिफेट, अॅट्राझीन, बेनफ्युरोकार्ब, ब्यूटाक्लोर, कॅप्टान, कार्बेन्डाझीम, कार्बोफ्युरॉन, क्लोरपायरीफॉस, डेल्टामेथ्रीन, डायकोफॉल, डायमिथोएट, डायनोकॅप, डायुरॉन, मॅलाथिऑन, मॅन्कोझेब, मेथिमील, मोनोक्रोटोफॉस, ऑक्सिफ्लुओरोफेन, पेंडिमेथालिन, क्विनॉलफॉस, सल्फोफ्युरॉन, थायोडीओकार्ब, थायोफॅन्टेमिथाइल, थायरम, झिनेब आणि झायर
कीटकांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो
इको-पेस्ट ट्रॅप' हा प्रकाश सापळा, चिकट सापळा आणि कामगंध सापळा याचे संयुक्तरित्या काम करते. पिवळ्या आणि निळा रंगाचा चिकट सापळा दिवसा शेतात उडणारे हानिकारक कीटक उदा.पांढरी माशी, तुडतुडे, फळ माशी, फुलकिडे पंखाचा मावा, नागअळी ची माशी व इतर उडणारे बारीक कीटक त्याला आकर्षित होऊन चिटकतात.
तसेच मीज माशी,खोड किडीची माशी, कंदमाशी याचाही यामध्ये समावेश होतो.
या सापळ्यात ठराविक प्रकाश तिव्रतेचा व स्वयंचलीत लाईट लावलेला असुन तो अंधार पडल्यावर प्रकाशमान होऊन रात्री संचार करणारे विविध प्रकारचे गळ्याचे पतंग जसे की गुलाबी बोंडआळी पतंग, अमेरिकन बोंडआळी पतंग, टिपक्याची बोंडआळी पतंग , फळ पोखरणाऱ्या अळीचा पतंग, शेंडे पोखरणाऱ्या अळीचा पतंग, पाने गुंडाळणाऱ्या अळीचा पतंग उडणारे कीटक हे प्रकाशामुळे आकर्षित होऊन सापल्याला चिटकतात. प्रकाश सापळे हे बॅटरी वर, सेल वर चालतात.
प्रकाश सापळ्याच्या उपयोगाने हानिकारक कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो.
कमी खर्चात जास्त फायदा
मजूर खर्च , फवारणी खर्च , मास्क ट्रापिंग पैसा वाचतो.
आपल्याला जर इको पेस्ट ट्रॅप हवे असतील तर संपर्क साधावा - गोपाल उगले- 9503537577
Published on: 07 April 2022, 01:35 IST