यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. यामुळे शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. जून महिना पूर्ण कोरडाच गेला आहे. आता हा महिना देखील कोरडाच जाण्याची शक्यता आहे. यामुळे यंदा परिस्थिती अवघड झाली आहे.
आजही सुमारे ६५ टक्के क्षेत्र हे पेरणीशिवाय पडून आले. शेतकरी पावसाच्या अपेक्षेने पेरणी करण्याचे धाडस करू लागलेला आहे. खरीप हंगामाला प्रारंभ होऊन आता एक महिना पूर्ण झाला.
या काळात पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या. कमी पाण्यात पेरणी केलेल्या काही शेतकऱ्यांच्या पेरण्या अडचणीत सापडल्या. यामुळे त्यांचे नुकसान होणार आहे.
टोमॅटोसाठी दुकानदाराने तैनात केले बाउन्सर, सांगितले धक्कादायक कारण
तसेच बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी कृषी खात्याकडे दाखल होत आहेत. सोयाबीन उगवणीचा प्रश्न यंदा बियाणे कंपन्यांसाठी डोकेदुखी बनण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पेरण्यांना उशीर होत असल्याने कपाशीच्या लागवड क्षेत्रावर यंदा परिणामाची शक्यता वाढत आहे. खरिपात पावसाच्या पाण्यावर पिके अवलंबून असल्याने उत्पादनावर परिणामाची चिन्हे वाढू लागली.
४ हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा...
यंदाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत अवघा २९ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यात अजून कसलाच पाऊस झाला नाही.
टोमॅटोवर मोठी ऑफर! दिल्लीत टोमॅटोची किंमत 200 रुपये किलोपर्यंत, ऑनलाइन साइट्सवर फक्त 100 रुपये किलोने विक्री
अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू, धक्कादायक प्रकार आला समोर...
देशभरात पावसाचा हाहाकार, ३४ जणांचा मृत्यू, असा असेल पावसाच अंदाज, जाणून घ्या...
Published on: 12 July 2023, 10:15 IST