सातारा जिल्ह्यातील करमाळा येथील पोथरे येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेतात मका पिकाला पाणी देण्यासाठी सुखदेव झिंजाडे गेले होते. यावेळी रात्रीच्या अंधारात झिंजाडे यांना सर्पदंश झाला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे झिंजाडे यांचा बळी दिवसाच्या भारनियमनाने घेतला असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला असून त्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीची मागणी केली आहे.
झिंजाडे यांच्या अशा जाण्याने त्यांचा कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. उन्हाचा वाढत्या पाऱ्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे. त्यात महावितरण कंपनीकडून अनेक दिवसांपासून रात्री वीज पुरवठा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतशिवारात जाऊन पिकाला पाणी द्यावे लागत आहे. अशाचप्रकारे झिंजाडे पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्यांना काहीतरी चावल्याचे जाणवले.
त्यानंतर त्यांनी त्वरित घरी येऊन सर्पदंश झाला असल्याचा अंदाज आपल्या परिवाराल दिला. नातेवाईकांनी घाबरून तत्काळ त्यांना दुचाकीवरून करमाळा येथील खासगी रुग्णालयात आणले. मात्र, रुग्णालयात येताच उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या ग्रामीण भागात रात्री ९ पासून पहाटे ५ वाजेपर्यंतच शेतीपंपासाठी वीजपुरवठा केला जातो.
सध्या विहिरी, तलावात पाणीसाठा असून दिवसा विज पुरवठा नसल्याने रात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. दिवसा वीज असती तर साप दिसून झिंजाडे यांना काळजी घेता आली असती. त्यामुळे दिवसा किमान आठ तास वीजपुरवठा करण्याची मागणी बळीराजा शेतकरी संघटना करत आहे. तर झिंझाडेंच्या कुटुंबीयांना स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विम्याचा लाभ देण्याची मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
सोनं लवकरच दराचा रेकॉर्ड गाठण्याची भीती? शुक्रवारी सोनं महागले
Corona Mask; देशात कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क केला बंधनकारक..
आपत्कालीन संकटांपासून कसे कराल पिकांचे संरक्षण? शेडनेटमधील शेती म्हणजे काय ?
Published on: 23 April 2022, 02:19 IST