राज्यात दुधाच्या दरात अचानक मोठी घसरण झाली आहे. याचा परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत असून दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. गाईच्या दुधाला प्रति लिटर 35 रुपयांचा दर मिळत होता. मात्र, सध्या दुधाला प्रति लिटरसाठी 27 रुपयांचा दर मिळत असल्याने राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये दूध उत्पादक आंदोलन करत आहेत. किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी ५ डिसेंबर रोजी संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर दूध आंदोलन करणार आहेत.
मागिल काही दिवसांपुर्वी डॉ. अजित नवले यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करत सरकारवर टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये अजित नवले म्हणतात की, ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रात दुध उत्पादकांची लुटमार सूरू आहे. 35 रुपये प्रतिलीटर दुधाचा दर पाडून संघनमत करून दर 27 रुपयांपर्यंत नेला आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांमध्ये दुधाचा दर 25 रुपयांपर्यंत खाली नेला जाईल अशा प्रकारचे संकेत देण्यात आलेले आहेत असे अजित नवले म्हणालेत.
किमान 35 रुपये शेतकऱ्यांना दुधाचे दर द्यावे. असं झालं नाही आणि शेतकऱ्यांची लुट सुरु राहिली, तर मंत्र्यांच्या दारामध्ये येऊन सणासुदीच्या काळात दूध ओतण्याचे आंदोलन दूध उत्पादक शेतकरी संघटन समिती आणि किसान सभेला करावं लागेल असा इशारा नवलेंनी दिलाय. दुधाला किमान प्रतिलिटर 35 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी केली आहे.
मात्र अजूनही दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने दूध उत्पादक आक्रमक होवून आंदोलन करत आहेत.उपोषण, आंदोलने सुरू असतानाही दुग्धविकास विभाग दखल घेत नसल्याने दूध उत्पादक हतबल झाले आहेत. तसेच किसान सभेचे नेते डॉ.अजित नवले यांनी ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता संगमनेर येथील प्रांत कार्यालयासमोर दूध आंदोलन करणार आहेत. या संर्दभातील एक पोस्ट अजित नवले यांनी फेसबुक च्या माध्यमातुन शेअर केली आहे. त्यात त्यांनी 5 तारखेला संगमनेर प्रांत कार्यालयात दूध ओतणार !नंतर कोठे ओतायचे सांगा !सोडत नसतोय आता. दूध संघांनी खरेदी दर आणखी 1 रुपयांनी घटविले !संघर्ष अटळ आहे ! रस्त्यावर उतरा !दुधाला किमान ३४ रूपये दर द्या अशी मागणी करत या आंदोलनात हजारोंच्या संखेने सामील व्हा, शेतकरी एकजूट महाबूत करा, असे आवाहन अजित नवले यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
Published on: 03 December 2023, 04:17 IST