News

राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे कोणता पक्ष कोणासोबत जाईल, हे कोणीही सांगू शकत नाही. यामुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून गेला आहे. आता शिवसेना सारख्या मोठ्या प्रादेशिक पक्षात देखील फूट पडली. या धक्क्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत.

Updated on 08 August, 2022 10:54 AM IST

राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे कोणता पक्ष कोणासोबत जाईल, हे कोणीही सांगू शकत नाही. यामुळे सर्वसामान्य माणूस गोंधळून गेला आहे. आता शिवसेना सारख्या मोठ्या प्रादेशिक पक्षात देखील फूट पडली. या धक्क्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत.

सध्या नवे सरकार स्थापन होवून महिना उलटला तरी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर महाराष्ट्रात पुन्हा सत्तापेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप हा आपल्या युतीच्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप अनेकदा होत आला आहे. या दरम्यान माजी मंत्री आणि रासप नेते महादेव जानकर चर्चेत आले आहे. ते दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांची देखील भेट घेतली. यामुळे चर्चा सुरू आहे.

वीज बिल येईल आपोआप कमी, घरातील 'ही' उपकरणे करा बंद

असे असताना जानकर महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जावून मिळणार का? अशा चर्चा सुरू आहे. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना महादेव जानकर हे मंत्री होते. त्यानंतर विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर जानकर आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेत झाल्याची बातमी आली होती.

अधिक उत्पादनातून भरघोस नफा मिळवून देणारी कारल्याची लागवड, शेतकऱ्यांसाठी ठरत आहे फायदेशीर..

दरम्यान, जानकर यांनी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात स्वतंत्र निवडणुका लढणार अशी घोषणा केली होती. यामुळे या चर्चा अजूनच रंगल्या होत्या. यावर जानावर म्हणाले, राजकारणात जर-तरला किंमत नाही. मी सध्या एनडीएसोबत आहे. त्यामुळे या बोलण्याला अर्थ नाही, असे ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या;
दूध दरात एक रुपयाची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सातबारा वरील जातीवाचक नावे हद्दपार! ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
अखेर उद्या डिसले गुरुजी अमेरिकेत जाणार! अनेक घडामोडींमधून निघाला मार्ग..

English Summary: Will Mahadev Jankar leave BJP? Jankar said...
Published on: 08 August 2022, 10:54 IST