देशात सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे आता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून प्रचार आणि घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात मोठी चुरस निर्माण झाली आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सोपी वाटणारी ही निवडणूक अखिलेश यांनी आता चुरशीची केली आहे. त्यांनी अनेक भाजप आमदार आणि मंत्री हे सपामध्ये घेत भाजपला मोठा धक्का दिला आहे. यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनामुळे सध्या प्रचार कमी असला तरी घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. यातच आता अरविंद केजरीवाल यांचा फॉर्म्युला अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात विजयाच्या जवळ घेऊन जाणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल 200 यूनिटपर्यंत वीज मोफत देत आहेत. यामुळे दिल्लीत जवळपास 2 कोटी 19 लाख नागरिकांना वीज बील शून्य येते. यामुळे त्यांचा त्यांना निवडणुकीत फायदा होतो. त्यांच्या विजयाचे साधे आणि सरळ गणित आहे. वीज आणि पाणी मोफत देणे. आता याच तत्वावर चालण्याचे अखिलेश यादव यांनी ठरवले आहे. आता अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत त्यांची ही घोषणा मास्टरस्ट्रोक मानली जात आहे. यामुळे ही घोषणा त्यांना विजय मिळवून देईल, असे म्हटले जात आहे.
समाजवादी पार्टीचे सरकार आल्यावर, घरगुती वीज ग्राहकांना 300 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा वायदा अखिलेश यादवांनी केला आहे. यामुळे आता उत्तर प्रदेशमधील जनता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यातही 300 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केजरीवालांनी केली आहे. वीज मोफत देण्याचा केजरीवालांचा फॉर्म्युला दिल्लीत हिट ठरला आहे. आता योगींना रोखण्यासाठी अखिलेश यादवांनीही तोच फॉर्म्युला वापरल्याचे पाहायला मिळाले.
यामुळे आता रंगत वाढली आहे, भाजपकडून मोदींनी येथे जोरदार प्रचार केला आता निवडणूक आयोगाकडून कोरोनामुळे प्रचाराला बंदी आहे. मात्र छुपा प्रचार जोरदार केला जात आहे. तसेच गोवा पंजाब मध्ये देखील भाजपकडून जोरदार प्रचार सुरु आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवरून योगींची आगामी वाटचाल ठरणार आहे. यामुळे त्यांनी ही निवडणुक जिंकण्यासाठी मोठी तयारी केली आहे. घोषणांचा पाऊस देखील पाडला जात आहे. महाराष्ट्रातून अनेक नेते देखील प्रचारात दाखल होत आहेत. आता कोण जिंकणार हे लवकरच समजेल.
Published on: 25 January 2022, 05:31 IST