भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. सामान्यतः आपल्या देशामध्ये दोन्ही हंगामात वेगवेगळी पिके घेतली जातात या मध्ये रब्बी आणि खरीप हंगाम असतात. रब्बी हंगामात आपण गहू, ज्वारी, हरभरा, गाजर इत्यादी पिकांचे उत्पन्न घेतो. तसेच खरीप हंगामात बाजरी, मका, सोयाबीन, मूग इत्यादी पिके घेतली जातात. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या ही शेती व्यवसाय करून आपले जीवन जगत आहेत.
प्रामुख्याने खरीप हंगामात आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतो. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, काबोली ही पिके घेतो. रब्बी हंगामात या पिकांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामात या पिकांना जास्त प्राधान्य दिले जाते. आता खरीप हंगामाची संपूर्ण कामे आटोपत आली असली तर बळीराजाने रब्बी हंगामाची सुरुवात केली आहे. रानांची मशागत करून रब्बी हंगामाच्या पेरणी ला बळीराजाने सुरुवात केली आहे.
हरभरा हे रब्बी हंगामातील प्रमुख घेतले जाणारे पीक आहे. सध्या बाजारात काबोली हरभरा ला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तसेच सध्या सानवरी मुळे भाव वाढण्याची अजून शक्यता आहे. गेल्या वर्षी हरभरा ला बाजारात प्रचंड मागणी तसेच भावात सुद्धा चांगला चढ दिसून आला होता.
हेही वाचा:-जाणून घ्या, कडकनाथ कोंबडीची वैशिष्ठे, वाचा सविस्तर
सध्या बाजारात काबुली हरभऱ्याला 8 हजार 50 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. परंतु येणाऱ्या काही दिवसात हरभरा चे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. सध्या सणासुदीचा काळ असल्यामुळे तसेच लग्नसराई सुरू झाल्याने काबोली हरभऱ्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यंदा च्या वर्षी उत्पादनात वाढ होऊन पेरीसाठी लागणारी बियाणे यातून याचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी जास्त प्रमाणात काबोली हरभऱ्याची पेरणी करावी.
Published on: 12 October 2022, 11:02 IST