News

देशात सध्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. याचे कारण म्हणजे अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती संबंधित सर्वच खते देखील महाग झाली आहेत. यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.

Updated on 22 January, 2022 11:29 AM IST

देशात सध्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. याचे कारण म्हणजे अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती संबंधित सर्वच खते देखील महाग झाली आहेत. यामुळे आता शेती करायची तरी कशी असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. यामुळे आता आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा होणार याकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

मोदी सरकारने रद्द केलेले कृषी कायदे, अवकाळी पाऊस, खतांच्या किमती यावरून हा अर्थसंकल्प गाजणार आहे. कृषी क्षेत्रावर सध्या अनेक मोठी संकटे आहेत. यासाठी यावर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रावर मोठी तरतूद करण्याची गरज अनेकांनी बोलून दाखवली आहे. शेतकऱ्यांना या परिस्थितीत आधार देण्याची गरज आहे. देशातील 90 टक्के शेतकऱ्यांकडे दोन एकरपेक्षा कमी क्षेत्र आहे. शेतीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नामुळे घरगाडा हाकणे कठीण झाले आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काय योजना सरकार आखणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी सरकार कात्री लावणार की अर्थसहाय्याचं पॅकेज घोषित करणार याकडं शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. कोरोना काळात कृषी आणि आरोग्य या दोनच क्षेत्रात मोठी गरज निर्माण झाली होती. यामुळे याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी योजना हाती घेतली. त्यामुळे वर्ष 2019-20 साठी कृषी क्षेत्रासाठी बजेटमध्ये भर घालून 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत करण्यात आले. यामध्ये शेकऱ्यांना मदत केली जाते. यामुळे सरकारवर याचा मोठा ताण पडला आहे.

शेतकऱ्यांना वार्षिक दोन हजार रुपये देखील दिले जातात, आता मात्र यामध्ये वाढ करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या खतांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यामुळे शेतीचे आर्थिक गणित विस्कटले आहे. यामध्ये देखील कपात करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. गेल्या एकाच महिन्यात अनेक खतांच्या किमती तब्ब्ल दुप्पट वाढल्या आहेत. यामुळे यामध्ये दिलासा देण्याची मागणी केली जात आहे. यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांना काय दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English Summary: Will fertilizer prices go down? installment Kisan Yojana increase? Narendra Modi is likely big decision budget. (1)
Published on: 22 January 2022, 11:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)