महिला शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्यावतीने राज्यामध्ये 300 महिला शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या उभारण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. महा जीवीका अभियानात राज्यात जवळपास 56 लाख कुटुंबे सहभागी असून याद्वारे पाच लाख 47 हजार स्वयंसहायता गटांची निर्मिती करण्यात आली आहे.या गटांना आतापर्यंत 12479 कोटी रुपयांची बँक कर्ज देण्यात आली असूनजवळपास नऊशे छप्पन कोटी रुपयांचा समुदाय निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत चार उपप्रकल्प मंजूर
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत चार रुपये प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत व त्यांची किंमत 4.15 कोटी रुपये आहे. अजून दोनशे प्रकल्पाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून 300 महिला शेतकरी उत्पादक कंपन्या निर्मितीचे यांमध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
महा जीविका अभियानाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यास सोबतच किमान दहा लाख महिलांना उपजीविका साधने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट या अभियानाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये उमेद अभियानाच्या माध्यमातून महिलांनी पुढाकार घेत मास्क निर्मिती केली व त्या विक्रीतून 11.25 कोटी रुपयांची उलाढाल केली. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्नप्रक्रिया योजनेच्या माध्यमातून 15 कोटी रुपयांचे बीज भांडवल वितरित केले आहे व त्यासोबत लवकरच 13 कोटी रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली.
मुंबईत महाजीविका अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ प्रसंगी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार,अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, उमेद चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Published on: 13 March 2022, 12:26 IST