News

मागील ६ दिवसांपासून नाशिकमधील बाजार समित्या बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

Updated on 25 September, 2023 4:51 PM IST

Ajit Pawar :

नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समितीतील लिलाव सहा दिवसांपासून बंद आहेत. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या (दि.२६) रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. मागील ६ दिवसांपासून नाशिकमधील बाजार समित्या बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं आहे. यावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तसंच अब्दुल सत्तार यांनी देखील उद्या बैठक बोलावली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर अजित पवार आणि अब्दुल सत्तार तोडगा काढणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाशिकमध्ये कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारला असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांच्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संप कायम राहणार असल्याचा निर्धार घेतला आहे. त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या काही दिवसांत दिल्लीत धडक मोर्चा देऊ, असा इशारा कांदा उत्पादक शेतकरी संघनेने दिला आहे.

नाशिकमधील कांदा लिलाव मागील सहा दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे बाजार समितीतील आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने कोट्यवधीचे नुकसान होतं आहे. दुसरीकडे, या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शेतकरी संघटनांनी बैठक बोलावली होती. आज लासलगावमध्ये जिह्यातील शेतकऱ्यांची एकत्रित बैठक पार पडली.

आज नाशिकमधील शेतकरी संघनांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी येवला, चांदवड, निफाड, नांदगाव आदी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बैठकीला उपस्थित होते. यावेळी गेल्या सहा दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कष्टाने पिकवलेल्या कांद्याचा दर मिळाला पाहिजे. तसंच ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण व्हायलाच पाहिजे, एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना सरकार काय करत आहे? असा सवाल शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला.

English Summary: Will Ajit Pawar solve the strike of onion traders onion update
Published on: 25 September 2023, 04:51 IST