येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगाने वारे वाहून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले असून येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलाआहे. त्याचा परिणाम होऊन पश्चिम किनारपट्टीवर पुढच्या तीन ते चार दिवस वेगवान वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
.मुंबई ठाण्यासह उपनगर,रत्नागिरी,रायगड,पालघर,कोल्हापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये अती मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असं सांगण्यात आला आहे.
कोकणातील जिल्ह्यांचा याचा सर्वाधिक धोका असल्याचा हवामान खात्याकडून सांगण्यात आल आहे.
त्यामुळे कोकणात आणि किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यलो अलर्ट असलेले जिल्हे- ठाणे,मुंबई,सिंधुदुर्ग, नासिक,वाशिम,गोंदिया,बुलढाणा, अकोला,अमरावती, यवतमाळ वर्धा,चंद्रपुर,नागपूर,भंडारा, गोंदिया
Published on: 12 September 2021, 07:38 IST