News

मोकाट फिरणाऱ्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. बऱ्याचदा मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतुक कोंडी आणि अपघातासारख्या गंभीर समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक भागात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अशी मागणी वारंवार केली जाते.

Updated on 02 August, 2022 5:42 PM IST

मोकाट फिरणाऱ्या जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. बऱ्याचदा मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे वाहतुक कोंडी आणि अपघातासारख्या गंभीर समस्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक भागात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अशी मागणी वारंवार केली जाते. मात्र या प्रश्नाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जात.

धुळे जिल्ह्यात जनावरांना पकडण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या भागात मोकाट फिरणाऱ्या गुरांचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीच्या कोंडीसह अपघातही वाढू लागले. त्यामुळे गुरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती.

अखेर महापालिकेने मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम सुरु केली. आतापर्यंत ५२ मोकाट गुरांना पकडण्यात आले आहे. दोन दिवसांपासून आयुक्त टेकाळे यांच्या मार्गदर्शनानुसार ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न गांभीर्याने घेत महापालिकेने अशी धडक कारवाई केली आहे.

महापालिकेने या मोहिमेसाठी ६० जणांचे पथक तयार केले आहे. ही मोहीम सुरु करण्यापूर्वी मनपा प्रशासनाकडून मोकाट जनावराच्या मालकांना २४ तासांची नोटीस देण्यात आली होती. मात्र या मोहिमेमुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस यांनी माहिती देताना सांगितले की, महापालिकेने शहरातील मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी ६० जणांचे पथक तयार केले आहे.

Common wealth Games: शेतकरी मुजूराच्या मुलाची गोल्डन कामगिरी; राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी थोपटली पाठ

रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने अनेकवेळा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे जनावरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे
शनिवारपासून शहरात मोकाट गुरे पकडून गोशाळेत पाठविली जात आहे. संबंधित गुरे मालकांनी आपली गुरे ताब्यात घ्यावी. नाहीतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या:
संकटाची मालिका सुरुच; आता 'केना' गवतामुळे शेतकरी मेटाकुटीला
मोठी बातमी: मिश्र खतांचे उत्पादन बंद होणार? राज्यातील आठ खत उत्पादकांना नोटीसा

English Summary: Why will the Municipal Corporation's 'Cow Catch Campaign' be successful? Recruitment of 60 staff for the campaign
Published on: 02 August 2022, 05:42 IST