News

अलिकडच्या वर्षांत, हाय एचपी ट्रॅक्टरच्या बाजारपेठेत सतत वाढ होत आहे, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हाय एचपी ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न आणि तंत्रज्ञानाबद्दल त्यांची वाढती समज हे मानले जाते.

Updated on 27 September, 2023 5:34 PM IST

Tractor News :

भारतीय ट्रॅक्टर बाजारपेठेत काळानुसार मोठे बदल होताना दिसत आहेत. शेतीच्या या बदलत्या युगात ट्रॅक्टरचे तंत्रज्ञानही बदलत आहे. शेतकरी आता जास्त हाय एचपी ट्रॅक्टर खरेदी करत आहेत. अलिकडच्या वर्षांत, हाय एचपी ट्रॅक्टरच्या बाजारपेठेत सतत वाढ होत आहे, याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हाय एचपी ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांचे वाढते उत्पन्न आणि तंत्रज्ञानाबद्दल त्यांची वाढती समज हे मानले जाते. शेती व्यतिरिक्त, ट्रॅक्टरचा वापर खाणकाम, बांधकाम आणि वाहतुक अश्या अनेक कामांसाठी केला जातो, ज्यासाठी हॉर्स पॉवर ट्रॅक्टरची आवश्यकता असते.

ट्रॅक्टरची मागणी वाढण्याचे कारण-
विशेष म्हणजे ट्रॅक्टर हे आता केवळ शेतीच्या कामांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते खाणकाम, बांधकाम, वाहतूक आणि लहान घरगुती कामांमध्ये देखील वापरले जात आहेत. केयरएजच्या अहवालानुसार, देशातील एकूण ट्रॅक्टरच्या मागणीपैकी सुमारे 30 टक्के ट्रॅक्टरचा वापर आता बिगर कृषी कारणांसाठी केला जातो.


आकडे काय आहेत?
उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेत 31-40 HP ट्रॅक्टरच्या तुलनेत 41-50 HP श्रेणीच्या ट्रॅक्टरची मागणी वाढली आहे. आकडेवारीनुसार, 41-50 HP ट्रॅक्टरचा वाटा 2018 च्या आर्थिक वर्षात 55 टक्के झाला आहे जो 2013 मध्ये 41 टक्के होता. यावर्षी 2023 मध्ये आतापर्यंत 9 लाख 41-50 HP ट्रॅक्टरची विक्री झाली आहे, जी आजपर्यंतची सर्वाधिक विक्री आहे.

शेतकरी शेतीतील यांत्रिकीकरणाचे फायदे ओळखत आहेत आणि ट्रॅक्टरसह विविध शेती अवजारे वापरून त्यांची उत्पादकता वाढवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. या वाढत्या मागणीमुळे आणि माहितीमुळे भारतीय बाजारपेठेत हाय एचपी ट्रॅक्टरची विक्री सातत्याने वाढत चालली आहे.देशातील शेतीच्या या सतत बदलत्या परिस्थितीचे कारण बदलते तंत्रज्ञान आहे. आज, शेतकरी शेतीमध्ये हाय एचपी ट्रॅक्टर तसेच ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित उपकरणे वापरून त्यांची शेती सतत सुधारत आहेत. या बदलामुळे भारतीय शेतीतील उत्पादकता वाढण्याबरोबरच देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारेल.

English Summary: Why is the demand for tractors increasing day by day
Published on: 27 September 2023, 05:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)