News

लासलगाव : टोमॅटो पिकाचे दर गडगडल्याने हजारो शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. स्थानिक पातळीवरील प्रक्रिया उद्योगांची वाणवा प्रकर्षांने समोर आली आहे. सध्या शेतीवर मोठे संकट आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग टोमॅटो रस्त्यावर फेकून देताना दिसत आहे. टोमॉटोचे दर का घसरले? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

Updated on 31 August, 2021 11:34 PM IST

लासलगाव : टोमॅटो पिकाचे दर गडगडल्याने हजारो शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. स्थानिक पातळीवरील प्रक्रिया उद्योगांची वाणवा प्रकर्षांने समोर आली आहे. सध्या शेतीवर मोठे संकट आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग टोमॅटो रस्त्यावर फेकून देताना दिसत आहे. टोमॉटोचे दर का घसरले? असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे.

अन्य कृषीमालावर प्रक्रिया करणारे जिल्ह्यात कमी उद्योग आहेत. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. पण, यावर प्रक्रिया करणारे सर्वात जास्त उद्योग पुणे, नागपूर येथे आहेत. मालाला मागणी नसेल तर शेतकरी रस्त्यावर माल फेकून देतो. तो आपला रोष व्यक्त करतो. प्रचंड उत्पादनामुळे या मालासह कांदा व इतर कृषी मालाबाबत अनेकदा ही स्थिती ओढावते.

हेही वाचा : टोमॉटो उत्पादकांसाठी धावली किसान सभा ; केली बियाणांच्या चौकशीची मागणी

याकरिता जिल्ह्यामध्ये प्रक्रिया उद्योगाला चालना मिळणे आवश्यक आहे. पेस्ट तयार करून अतिरिक्त मालाच्या प्रश्नावर तोडगा काढता येईल. सद्यस्थितीत जिल्ह्यात प्रक्रिया करणारे तीन ते चार उद्योग आहेत. निसर्गाचा लहरीपणा, मागणी, कृषी मालाची निर्यात, धोरणांचा अभाव अशा सर्वाचा फटका बसत आहे. यासाठी स्थानिक पातळीवर उद्योगांची संख्या वाढणे आवश्यक आहे, असे निरीक्षण कृषीतज्ज्ञ व्‍यक्‍त करत आहेत.

 

भारतात केचप/सॉस सारखे पदार्थ निर्माण करणारे उद्योग उभे राहिले पाहिजेत.प्रक्रिया करणारे उद्योगांची संख्या वाढणे आवश्यक आहे. टोमॉटोचे पीक मोठ्या प्रमाणावर येतं. त्यामुळे त्यापासून बनविल्या जाणाऱ्या अत्रपदार्थांना भारतात व परदेशात सतत मागणी असते. सध्या यावर आधरित अनेक लघुउद्योग तयार होत आहेत.रस, प्युरी, पेस्ट, कॉकटेल, केचप, सॉस, सूप, ज्युस, वेफर्स, चटणी पावडर अशी उत्पादन तयार करता येतात. सर्वांगीण उपाययोजना व्हाव्यात तसेच या पदार्थांना सुध्दा बाजारात अधिक मागणी असते. सद्यस्थितीमध्ये टोमॅटो पिकाचे दर हे खूप खाली आले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. साधारणपणे प्रत्येक वर्षातील काही महिन्यांमध्ये या स्वरूपाची परिस्थिती निर्माण होते.

सध्य परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चदेखील निघत नाही.या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तसेच कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ठिबक सिंचन, मल्चिंग पेपर, टोमॅटो बियाणे यावर सरकारकडून भरघोस अनुदान देण्याची गरज आहे. सर्व शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किमतीवर सरकारने नियंत्रण करावे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. टोमॅटोवरील प्रक्रिया उद्योग उभे राहणे आवश्यक आहे. पण, त्यांनादेखील सरकारी आधाराची गरज आहे.

 

कारण ज्यावेळेस हे पीक महाग होईल. त्यावेळेस प्रक्रिया उद्योग सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी प्रक्रिया उद्योग उभे करून करार पद्धतीने शेतकऱ्यांचे हे पिक खरेदी होईल. अशी व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी आणि प्रक्रिया उद्योग उभारणारे कारखानदार दोघेही सुरक्षित राहू शकतील.

English Summary: Why did tomato prices fall? Why was it time for farmers to throw tomatoes on the road
Published on: 31 August 2021, 11:34 IST