गेल्या वर्षभरापासून लाखो शेतकरी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, विधानसभेत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राला प्रश्न केले.
राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात तीन कृषी विधेयके मांडली त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू सुधारणा छगन भुजबळ यांनी मांडल्या त्यावेळी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात का आहे ही महत्वाची भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या नावाने चर्चा करून शेतकऱ्यांचा खेळ सरकारने मांडला आहे तसेच शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले असा चित्रविचित्र प्रकार आपल्या देशात घडत आहे.
शेतकऱ्यांसाठी केंद्राने जे कायदे केले आहेत ते कायदे शेतकऱ्यांना चुकीचे वाटत असतील तर यामधव गैरप्रकार काय आहे यामध्ये शेतकऱ्यांचा गुन्हा काय आहे. तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये जवळपास २०० शेतकरी मृत्युमुखी पडले तरीही केंद्र सरकारला अजून जाग नाही आली असा सुद्धा प्रश्न विधानसभेत मांडला गेला.
हेही वाचा:डिजिटल सातबारा च्या माध्यमातून शासनाला मिळाला 30 लाखांचा महसूल
शेतकरी हाच खरा कोरोना योद्धा :
कोरोना काळ चालू असताना सुद्धा जीवाची पर्वा न करता शेतकरी त्यांच्या कुटुंबासोबत शेतात धान्य पिकवत असत आणि आपल्यापर्यंत पोहचवत असत त्यामुळे खरा कोरोना योद्धा तर शेतकरी आहे. देशातील १९७२ साली पडलेला दुष्काळ मी पाहिलं आहे त्यावेळी अन्न सुद्धा खायला न्हवते.त्यावेळी अमेरिकेतून येणार लाल गहू आम्ही खाला आहे, मात्र त्यावेळी ही सर्व परिस्थिती बदलण्याची घोषणा स्वतः वसंतराव नाईक यांनी केली होती आणि त्यांनी राज्यामध्ये कृषिक्रांती आणण्याचे काम केले.
जो पर्यंत कृषिमंत्री शरद पवार होते तो पर्यंत ही कृषीक्रांती युपीए सरकारमध्ये टिकली, त्यावेळी शेतकऱ्यांना दुपटीने तिपटीने त्यांच्या मालाला भाव दिला. शेतकऱ्यांनी सुद्धा एवढे धान्य पिकवले की देशातील १२५ कोटी लोकांची भूक भागवून दुसऱ्या २५ देशांना अन्न पुरवठा केला पण आज हे केंद्र सरकारला त्या गोष्टीचा विसर पडला आहे यासारखी दुर्दैवाची गोष्ट कोणतीच नाही.
Published on: 08 July 2021, 06:08 IST