सध्या गुजरातमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याठिकाणी मोठी तयारी केली आहे. ही निवडणूक म्हणजे 2024 च्या लोकसभेची रंगीत तालीम असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे यामध्ये सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे.
यामुळे कोणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आज मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रानीप येथे निशान पब्लिक स्कूलमधील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, गुजरातची जनता सत्याची साथ न सोडणारी आहे. गुजरातच्या जनतेने मतदानासाठी अधिक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जनतेला केले. यामुळे किती टक्के मतदान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर निकाल अवलंबून असणार आहे.
शेतकऱ्यांनो १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवा, त्यानंतर होतोय खोडकिडीचा प्रादुर्भाव
अखरेच्या टप्प्यात अहमदाबाद, वडोदरा, गांधीनगरसह १४ जिल्ह्यांतील 93 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू आहे. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. यामध्ये जोरदार चुरस बघायला मिळत आहे. प्रमुख नेते याठिकाणी तळ ठोकून आहेत.
साखर करारात मोडतोड, निर्यातदारांनी कारखान्यांकडे केले दुर्लक्ष
89 जागांसाठी पहिल्या टप्प्प्यातील मतदान झाले होते. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या निवडणुकीत भाजप, आम आदमी पार्टी, काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होत आहे. यामुळे कोणाची सत्ता येणार हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
चळवळीचे साक्षीदार ९० वर्षाचे बयाजींची आज साथ सुटली! राजू शेट्टी भावूक
पारवडी येथे ऊस खोडवा पाचट कार्यक्रम संपन्न, शेतकऱ्यांना होणार फायदा
पुन्हा शेतकरी मैदानात! देशातील 550 जिल्ह्यांतील शेतकरी दिल्लीत 'गर्जना रॅली' काढून गर्जना करणार
Published on: 05 December 2022, 12:20 IST