अलिबागच्या कांद्याला जी आय मानांकन मिळाले असल्यामुळे या कांद्याची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. अवकाळी पाऊस आणि खराब हवामानाचा फटका कांदा पिकाला बसून शेतकऱ्यांवर दुबार लागवड करण्याची वेळ आली होती.
पडणारे धुके आणि करपा रोगामुळे पांढऱ्या कांद्याचे उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.पांढरा कांद्याचे आता काढण्याची वेळ असल्याने नेमक्या काढणीच्या वेळेस या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कांद्याचे पुरेशी वाढ न होता अपूर्ण वाढ झालेल्या कांदा काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. अलिबागच्या पांढरा कांद्याला त्याचे औषधी गुणधर्मांमुळे वेगळी ओळख असल्यामुळे त्याला बाजारात मोठी मागणी आहे.
अलिबाग तालुक्यातील पांढरे कांद्याचे स्थिती…
अलिबाग तालुक्याचा विचार केला तर पांढरा कांद्याचे 250 ते 300 एकर शेती क्षेत्र आहे.मागच्या वर्षी 270 हेक्टर वर हे पीक घेण्यात आले. अलिबाग तालुक्यातील वाडगाव,वेश्वि, मानतर्फे झिराड, कारले आणि खंडाळे अशा दहा ते बारा गावांमध्ये प्रामुख्याने पांढरा कांद्याचे पीकघेतले जाते.यावर्षीपांढरा कांद्याचेबी लागवडकेल्यानंतर नेमके रोपे उगवण्याच्या वेळेसच अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दुबार लागवड करावी लागली.
त्यानंतरही सातत्याने हवामानात बदल होत असून कडाक्याची थंडीतर कधी ढगाळ हवामान मध्येच पडणारे दाट धुके याचा एकत्रितपरिणाम कांदा पिकावर झालेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांना पांढरा कांद्याचे पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे.
Published on: 29 January 2022, 08:22 IST