News

कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १६ ऑगस्ट, २०१८ रोजी उडतारे येथील काळेश्वर मंदिराजवळील सभागृहात हुमणी व्यवस्थापन व शेतकरी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीस कृषि विज्ञान केंद्र, बोरगावाचे कार्यक्रम समन्वयक यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करुन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यामध्ये कृषि महाविद्यालय, कोल्हापुरचे कृषि कीटकशात्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी हुमणीचा जीवनक्रम, कालावधी, प्रजनन इ. विषयाचे सोप्या भाषेत समजावून त्याचे नियंत्रण करणेविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले.

Updated on 24 August, 2018 1:15 AM IST

कृषि विज्ञान केंद्र, बोरगांव व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक १६ ऑगस्ट, २०१८ रोजी उडतारे येथील काळेश्वर मंदिराजवळील सभागृहात हुमणी व्यवस्थापन व शेतकरी मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरवातीस कृषि विज्ञान केंद्र, बोरगावाचे कार्यक्रम समन्वयक यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करुन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यामध्ये कृषी महाविद्यालय, कोल्हापुरचे कृषी कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी हुमणीचा जीवनक्रम, कालावधी, प्रजनन इ. विषयाचे सोप्या भाषेत समजावून त्याचे नियंत्रण करणेविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना डॉ. मोहिते यांनी नर व मादी भुंगेरे यांच्या मिलानापासून ते प्रजनन ते वाढीच्या अवस्था व त्यावरील नियंत्रण याविषयी सादरीकरण केले. तसेच कमी खर्चात एरंड सापळा वापरून व जैविक अथवा रासायनिक निविष्ठा वापरून हुमणी नियंत्रण बाबतीत सखोल माहिती दिली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या शंकाचे समाधान केले. सादरीकरण झाल्यावर प्रत्यक्ष शेतावर जाऊन सुत्रकृमीचा वापर करुन हुमणी नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखविले. यावेळी खरीप पिकांची सद्यस्थितील वाढ, कीड रोग व्यवस्थापन याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी खरीप पिकांचे माहिती फलक लावण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री. कवडे, तालुक कृषी अधिकारी श्री. धुमाळ साहेब आत्मा साताराचे श्री. राऊत, जि.प. सातारचे माजी सभासद श्री. दिलीप बाबर, सरपंच स्वप्नील निंबाळकर, यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास वाई तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी व उडतारे गाव व पंचक्रोशीतील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश बाबर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. भूषण यादगीरवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे प्रा. सकटे, प्रा. पाटील, श्री. साळे व श्री. गायकवाड तसेच कृषि सहाय्यक श्री. निखील मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

English Summary: white grub management workshops and farmers' meet concluded in Udtare
Published on: 19 August 2018, 09:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)