News

आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. परंतु, काही शेतकरी अजूनही कापूस विकण्यास इच्छुक नाहीत, कारण शेतकरी कापसाला 10000 ते 11000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या प्रतीक्षेत होते. आता हा दर मिळत आहे.

Updated on 21 November, 2022 1:13 PM IST

आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कापसाचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाची आवक कमी होत आहे. परंतु, काही शेतकरी अजूनही कापूस विकण्यास इच्छुक नाहीत, कारण शेतकरी कापसाला 10000 ते 11000 रुपये प्रतिक्विंटल दराच्या प्रतीक्षेत होते. आता हा दर मिळत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत कापसाला सद्यस्थितीत सरासरी 9 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे आता कापसाची आवक वाढली असून दररोज सुमारे प्रत्येक समितीत 100 वाहनांमधून एक हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी येत आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत पळाशी येथील स्व. राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात कापूस खरेदीला महिनाभरापूर्वी सुरूवात करण्यात आली . त्यावेळी लिलावात मुहूर्ताच्या कापसाला 8 हजार 357 रुपये भाव मिळाला होता.

PM Kisan: 31 डिसेंबरच्या आगोदर करा हे काम; नाहीतर खात्यात येणार नाहीत २००० रुपये

आत्तापर्यंत सुमारे 12 ते 13 हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. असे असले तरी कापसाचे दर आणखी वाढतील हि आशा शेतकऱ्यांना कायम आहे. यामुळे अजूनही शेतकऱ्यांनी घरात साठविलेला कापूस विक्रीसाठी आणला जात नसल्याचे दिसून येत आहे.

नोकरी सोडली आणि 60 दिवसांचा कोर्स केला, आता घरी बसून 5 लाखांपेक्षा जास्त कमावतो

ऑक्टोबर महिन्यात तर नोव्हेंबरच्या 8 दिवसांत राज्यात नवीन कापसासाठी 6 हजार ते 7 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही कापूस साठविण्याचा विचार केला होता.

English Summary: White gold will make farmers rich; A big rise in cotton prices
Published on: 21 November 2022, 01:13 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)