केंद्र सरकारने कृषी कायदे लागू केल्यानंतर उत्तर भारतातील अनेक शेतकऱ्यांनी याला विरोध केला, हे कायदे मागे घेण्यासाठी अनेक शेतकरी दिल्लीत आंदोलन करत होते. अखेर मोदी सरकारला हे कायदे मागे घ्यायला लागले. यामुळे शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला. या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व हे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत हे करत होते. असे असताना आता ५ राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे शेतकरी नेते असलेले राकेश टिकैत कोणत्या पक्षाला समर्थन देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
दिल्लीतील आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे मतदान आपल्याकडे वळवण्याचा सगळ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. आंदोलनामुळेच आज सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांचे नाव घेऊ लागले आहेत, हा आंदोलनाचा मोठा विजय असल्याचे वक्तव्य भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी केले. शेतकऱ्यांना आता स्वत: चा नफा तोटा पाहावा लागेल. त्यामुळे पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका राकेश टिकैत यांनी मांडली आहे. प्रयागराजमध्ये टिकैत यांनी भूमिका जाहीर केली. यामुळे त्यांनी कोणालाच समर्थन देणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
समर्थन दिल्याच्या ज्या बातम्या येत आहे त्या चुकीच्या आहेत. लोकांचा याबाबत काहीतरी गैससमज झाला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढवावी, असे राकेश टिकैत यावेळी म्हणाले. यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ठ केली आहे. मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा विधानसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार राजपाल बल्यान यांनी नरेश टिकैत यांची भेट घेतली होती. त्यानंतर नरेश टिकैत यांना समर्थन दिल्याचे सांगितले जात होते. मात्र याबाबत देखील त्यांनी नकार दिला आहे. सध्या उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत.
उत्तरेकडील राज्यात शेतकरी मतदारांचा मोठा प्रभाव पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे ज्यांना समर्थन मिळणार आहे, त्यांना ही निवडणूक सोपी जाणार आहे. यामुळे अनेक पक्ष शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विषय याठिकाणी मांडत आहेत. सुरुवातीला भारतीय किसान संघटनेचे प्रमुख नरेश टिकैत यांनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देण्याचा निर्णयही देखील घेतला होता. मात्र, त्यांच्या या निर्णयाचा त्यांचे बंधू राकेश टिकैत यांनी इन्कार करत विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका टिकैत यांनी घेतली आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.
Published on: 21 January 2022, 02:53 IST