News

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात एक घोषणा केली. ही घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आता याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Updated on 17 March, 2022 10:45 AM IST

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात एक घोषणा केली. ही घोषणा म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे आता याबाबत चर्चा सुरु झाली आहे. घोषणा झाली असली तरी ही मदत कोणाला मिळणार आणि याबाबत काय नियम अटी आहेत, हे मात्र अनेकांना माहिती नव्हते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत संपूर्ण गणित सांगितले आहे.

आता याबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते, कोणत्या काळात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम अदा केली जाणार? प्रत्यक्ष मदत रक्कम केव्हा जमा होणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी या सर्व प्रक्रियेची उकल केली आहे. त्यामुळे नियमित कर्ज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या प्रोत्साहन रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यात असे लाखो शेतकरी आहेत ज्यांना या रकमेचा फायदा होणार आहे. याबाबत अजित पवार म्हणाले, सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनांक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2018- 19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर ही 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. याबाबत शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2018-19 मध्ये पीककर्ज घेतलेले आहे पण त्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे.

याबाबत महाविकास आघाडी सरकाने याआधीच घोषणा केली होती, मात्र कोरोना आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती यामुळे ही रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नव्हती. मात्र, आता ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याकरिता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

तसेच महिला शेतकऱ्यांबाबत देखील राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आतापर्यंत महिला शेतकऱ्यांचा योजनेत 30 टक्के सहभाग होता तो वाढवून 50 टक्के पर्यंत केला जाणार आहे. यामुळे येणाऱ्या काळात शेती क्षेत्रात महिला देखील आत्मनिर्भर होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना आता वीज बिलातून दिलासा, 'हे' सरकार बसवणार सोलर पॅनल..
क्षमतेपेक्षा अधिकचे गाळप, तरीही ऊस फडातच, नेमकं पाणी कुठं मुरतय? जाणून घ्या...

 

English Summary: Which farmers will get Rs 50,000? Ajit Dada said 'this' math ...
Published on: 17 March 2022, 10:45 IST