शहरी-ग्रामीण विकासात तफावतीची दरी. आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, लाईट, रोजगार, पायाभुत सुविधा, कृषी उद्योग नगण्य गुंतवणूक.शेतकरी विरोधी कायद्यांमुळे तो अजुनही पारतंत्र्यात आहे.आमची तर स्वातंत्र्याची लढाई अजुन चालु आहे.शेतकऱ्यांना आपल्या वावरात भयमुक्त वावर करण्याचे स्वातंत्र्य नाही, कारण "वन्य जीव संरक्षण अधिनियम"
शेतकऱ्यांना मालमत्तेचा मुलभूत आधिकार नाही,Farmers have no fundamental right to property,कारण भूमी अधिग्रहण, पूनर्वसन व पुनर्व्यवस्थापनात योग्य भरपाई व पारदर्शकतेच्या हक्काचा कायदा"शेतकऱ्यांना व्यापाराचे (खरेदी- विक्री) स्वातंत्र्य नाही, कारण "गोवंश हत्या बंदी कायदा"शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर विक्री करण्याचे स्वातंत्र्य नाही,
*कारण "कृषी उत्पन्नबाजार समिती कायदा.शेतकऱ्यांना आपला माल परदेशात पाठवण्याचे स्वातंत्र्य नाही, कारण "विदेशी व्यापार कायदा" व "विदेश व्यापार नीती".शेतकऱ्यांना मालमत्ता किती बाळगावी ह्याचे स्वातंत्र्य नाही, कारण "कमाल शेत जमीन धारणा कायदा".शेतकऱ्यांना न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य नाही, कारण "घटनेचे परिशिष्ट -9" व "आर्टिकल 31 ब".
शेतकऱ्यांना आपल्या मालाची किंमत ठरविण्याचे (निर्बंध नसले तरी निरर्थक), साठा किती ठेवायचा ह्याचे स्वातंत्र्य नाही, कारण "आवश्यक वस्तू कायदा"शेतकऱ्यांना आपल्या साखर कारखान्याचे धुराडे कधी सुरू करायचे, साखर किती निर्यात करायची, विक्री कोटा, अंतराची अट वगेरैचे स्वातंत्र्य नाही, कारण "ऊस (नियंत्रण) आदेश".
शेतकऱ्यांना आपल्या विहीरीतुन पाणी उपसण्याचे स्वातंत्र्य नाही, नवीन बोअर घेण्याचे स्वातंत्र्य नाही, कारण "महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम".शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा कुठल्या विमा कंपनी कडुन काढायचा ह्याचे स्वातंत्र्य नाही, कारण "प्रधानमंत्री पीक विमा योजना".
शेतकऱ्यांचा स्वतःच्या बँकेतील जमा पैशावर हक्क नाही. जसे ऊसाची एफआरपी, विम्याचे किंवा पीएम किसान सन्मान निधीचे - न सांगता वळते होतात किंवा ब्लाॕक करतात, कारण "सहकारी संस्था अधिनियम"शेतकऱ्यांना आपल्या शेतात कुठले पीक घ्यायचे, कुठले तंत्रज्ञानाचे बियाणे वापरायचे ह्याचे स्वातंत्र्य
नाही, *कारण "सिड अॕक्ट".कुठे आहे स्वातंत्र्य?सर्व ग्रामपंचायतींना विनंती की 15 आॕगस्टच्या ग्रामसभेमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रती सहवेदना दर्शविण्यासाठी, दोन मिनीटे उभे राहुन, श्रद्धांजली वहावी.
सतीश देशमुख, B.E. (Mech), पुणे अध्यक्ष, फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स 9881495518 एकच ध्यास- शेतकरी आणि एकात्मिक ग्रामीण विकास.
Published on: 11 August 2022, 05:30 IST