उन्हाळा आला की सगळ्यांनाच थंडगार पाणी प्यायची इच्छा होते. मग प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने थंडगार पाण्याची व्यवस्था करत असतात. कोण फ्रीजमधील पिते तर कोण माठातील. तसंच फ्रीजमधील पाणी आरोग्यसाठी धोकादायक मानलं जात म्हणून बहुतांश लोक पाण्याचे माठ घेतात. तसंच सर्वत्र बाजारात लाल, काळे आणि पांढरे माठ विक्रीसाठी आले आहेत. मात्र पाण्यासाठी कोणता माठ घ्यावा याबाबत अनेकांच्या मनात शंका असते. तर चला आज जाणून घेऊयात पाण्यासाठी कोणता माठ निवडावा.
सध्या सर्वत्र उन्हाच्या तीव्र झळा झळकत आहे. यामुळे नागरिकांना उष्मघाताच्या आणि चक्कर येण्याच्या समस्या होऊ लागल्या आहेत. वाढलेल्या उष्णतेमुळे तुमच्या शरीरामधील पाणी कमी होते. उन्हाळ्यात निरोगी शरीरासाठी तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे गरजेचे असते. अश्यावेळी प्रत्येकाच्या घरात फ्रिज असूनही घरातील लोक माठातील पाणी पिण्याचा संदेश देतात. माठातील पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम असते. आणि ते पाणी नैसर्गिकरित्या थंड होते.
सध्या बाजारात मातीच्या भांड्यांची दुकाने सजली आहेत. वेगवेगळ्या आकारांसोबतच, वेगवेगळ्या रंगांची भांडी देखील आपल्या दिसत आहेत. बऱ्याच ठिकाणी काळ्या आणि लाल रंगाच्या भांड्यांसह पांढरी भांडीही दिसत आहे. यामुळे नागरिक खरेदी करताना विचारत करत आहेत. पण कोणत्याही मातीच्या भांड्याचा वापर करणे फायदेशीर आहे. काळा रंग उष्णता लवकर शोषून घेतो. म्हणूनच काळ्या भांड्यातील पाणी लवकर थंड होते. ते शरीरासाठीही चांगले आहे. तसेच लाल आणि पांढऱ्या मातीच्या भांड्यांमधील पाणीही चांगले असते. परंतु या माठामधील पाणी तुलनेने कमी थंड असते.
ही भांडी खरेदी करताना ती तपासून पाहावीत कारण काही ठिकाणी भांडी बनवताना त्यात सिमेंट मिसळले जाते. म्हणून, तुम्ही कोणत्याही रंगाचे भांडे काळजीपूर्वक पाहिल्यानंतरच खरेदी करावे. भांडे खरेदी करताना, त्याचे वजन तपासा. मातीची भांडी हलकी असतात. तर सिमेंट मिसळलेले भांडे जड असते. तसेच, सिमेंट मिसळलेल्या भांड्यातील पाणी मातीच्या भांड्यातील पाण्याइतके चांगले नसते. म्हणून, थंड आणि निरोगी पाण्यासाठी मातीचे भांडे निवडा. मग ते काळे, लाल किंवा पांढरे असो. ते पाण्यासाठी चांगले असते.
पण काळ्या माठातील पाणी जलद आणि अधिक थंड होते. तसेच लाल आणि पांढऱ्या माठातील पाणी तुलनेने कमी थंड असते. तेव्हा माठातील पाणी प्या आणि ह्या उन्हाळ्यात निरोगी रहा.
Published on: 27 March 2025, 04:18 IST