News

भारताचा विचार केला तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या ही शेती उद्योगावर अवलंबून आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते.

Updated on 12 April, 2021 2:01 PM IST

भारताचा विचार केला तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या ही शेती उद्योगावर अवलंबून आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. आता कोरोना का असा जरी विचार केला तरी भारताच्या अर्थव्यवस्था जर सावली असेल तर ते कृषी मुळेच.

परंतु शेतकऱ्यांसाठी शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र असते आणि ते कुठे काढायचे याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. तर या लेखामध्ये आपण शेतकरी प्रमाणपत्र बद्दल माहिती करून घेणार आहोत.

 शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?

 शेतकरी प्रमाणपत्र हे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालय मध्ये असलेल्या सेतू केंद्रात व महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपले सरकार या पोर्टल वर देखील उपलब्ध असते. जर तुम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टल वरून मिळवायचे असेल तर तुम्ही ते https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून मिळवू शकतात.

 

शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पैकी एक कागदपत्र ओळखीचा पुरावा म्हणून द्यावे लागते.
  • शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वतःच्या नावे असलेल्या शेतीचा सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वयंघोषणापत्र भरून द्यावे लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत जोडावे लागते.

आपले सरकार पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • आपले सरकार पोर्टल च्या संकेतस्थळावर गेल्यानंतर नवीन वापर करता नोंदणी या लिंकवरून स्वतःचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करा.
  • लॉगिन तयार केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध भाग पाहायला मिळतात त्यापैकी महसूल विभाग सिलेक्ट करा.
  • महसूल विभाग सिलेक्ट केल्यानंतर त्यात महसूल सेवा हा ऑप्शन निवडा. त्यामध्ये पुढील शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय दिसतो. पुढे एक विंडोज ओपन होते त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची लिस्ट दिसते. त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.

 

  • वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, मागील किती वर्षापासून तुम्ही संबंधित पत्त्यावर हात आहेत याबाबतची माहिती सादर करावी.
  • अपलोड करायचे असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबी च्या दरम्यान असावी. सर्व कागदपत्रे आणि फोटो आणि सही अपलोड करावेत. त्यानंतर अर्ज सबमिट करावा.आपले सरकार पोर्टल वरून अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत आपल्याला शेतकरी प्रमाणपत्र मिळते.

माहिती स्त्रोत-tv9 मराठी( डेली हंट)

English Summary: Where can I apply for a certificate of being a farmer? What documents are required
Published on: 23 March 2021, 01:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)