Agri News :- ऊस या पिकाची लागवड प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये जास्त प्रमाणात केली जाते. नगदी पीक म्हणून या पिकाकडे महाराष्ट्रातील शेतकरी पाहतात. परंतु गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहिला तर शेतकऱ्यांसाठी हे पीक डोकेदुखी ठरत आहे. अनेक प्रकारच्या समस्या ऊस पिकाच्या बाबतीत निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च तर वाढत आहे.
तसेच ऊस तोडणीची समस्या खूपच गंभीर बनत चालली आहे. ऊस तोडणी साठी आवश्यक असणारे मजूर असतील किंवा ऊस वाहतूकदार यांच्याकडून देखील शेतकऱ्यांची बऱ्याचदा पिळवणूक होते. तसेच ऊस या पिकाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते दीर्घकाळासाठी हे पीक शेतात उभे राहत असल्यामुळे याचा व्यवस्थापना वरचा खर्च देखील बऱ्याचदा वाढतो.
या सगळ्या बाबींमुळे ऊस लागवडीत घट झाल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असे असले तरी यावर्षीच्या उसाचा गळीत हंगाम कधी सुरू होईल? याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच प्रश्न असेल. परंतु नुकतीच याबाबतीत एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर आलेली आहे.
कधी सुरू होणार यावर्षीचा ऊस गळीत हंगाम?
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, यावर्षीचा ऊस गाळप हंगाम हा दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचे समोर आले आहे. मागच्या वर्षी 15 ऑक्टोबरला गाळप हंगामाची सुरुवात झालेली होती परंतु यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उसाचा गाळप हंगाम सुरू होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे.
यावर्षीच्या तुलनेत जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर एक साखर कारखानदारांनी मागच्या वर्षी गाळप हंगाम लवकर सुरू करण्यासंदर्भात मागणी केलेली होती. परंतु या हंगामामध्ये तशी परिस्थिती दिसून येत नाही. त्यामुळे या वर्षीचा गाळप हंगाम दिवाळीनंतरच म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतर सुरू होईल असे साखर उद्योगातील जाणकारांकडून स्पष्ट करण्यात येत आहे.
यामागे बरीच कारणे असून त्यातील काही महत्त्वाची कारणे पाहिली तर यामध्ये लवकर हंगामाचे सुरुवात झाली तर बऱ्याचदा ऊस परिपक्व झालेला नसतो व अशा परिपक्व नसलेल्या उसाचे वजन खूप कमी भरते यामुळे जी साखरेची रिकवरी पाहिजे ती कारखानदारांना व्यवस्थित मिळत नाही व अशा उसामुळे शेतकऱ्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
हे प्रमुख कारण असून दिवाळीनंतर हंगाम सुरू झाला पाहिजे असे देखील साखर कारखानदारांचे मत आहे. तसेच दुसऱ्या बाबतीत जर आपण मजुरांचा विचार केला तर दिवाळीनंतरच बहुसंख्य मजूर ऊस तोडणी करिता येण्यासाठी उत्सुक असतात. नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीचे प्रमाण जास्त असते व त्यामुळे साखर उताऱ्यामध्ये देखील वाढ होते. या सगळ्या बाबी डोळ्यासमोर ठेवून विचार केला तर यावर्षीचा गाळप हंगाम हा नोव्हेंबर महिन्याच्या मध्यानंतरच सुरू करावा अशी साखर कारखानदारांची इच्छा असल्याचे समोर आले आहे.
Published on: 30 August 2023, 07:24 IST