देशातील शेतकरी पीएम किसानच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या वर्षाचा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार होता आणि दुसरा जुलै महिन्यात मिळणार होता परंतु अजून या हप्ताबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. पहिला हप्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी आशा व्यक्त केली जात होती. परंतु एप्रिल महिन्यात हा हप्ता जमा झाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली.
पहिला हप्ता मे महिन्यात येणार असल्याची शक्यता आहे. पीएम किसानच्या पहिल्या जमा झाला नाही कारण eKYC पूर्ण झाले नाही. तसेच अनेक शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक आधारसोबत अपडेट केलेले नाहीत. या कारणामुळे या हप्त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान ई-केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख ३१ मे आहे.
हप्ता न मिळाल्यास तुम्ही पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता.
पीएम किसान योजनेचा टोल फ्री नंबर: 18001155266
पीएम किसान हेल्पलाईन नंबर:155261
पीएम किसान लँडलाईन नंबर्स: 011—23381092, 23382401
पीएम किसानचे अपडेट केलेले हेल्पलाईन नंबर: 011-24300606
पीएम किसान हेल्पलाईन: 0120-6025109
ई-मेल आईडी: pmkisanict@gov.in
पीएम किसान पोर्टलवर तुमचे स्टेटस कसे पहाल
pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करा
उजव्या बाजूला तुम्हाला Farmers Corner दिसेल
Farmers Corner वर क्लिक करा
आता पर्यायातून, Beneficiary Status वर क्लिक करा
तुमचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, बँक खाते तपशील द्यावा लागेल. तुम्ही वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमचे नाव यादीत असल्यास ते तुम्हाला सापडेल.
महत्वाच्या बातम्या
रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या रेपो दर वाढीचा तुमच्यावर काय परिणाम होईल?
शब्बास रे पठ्या..! एक एकरात घेतले तब्बल १२ लाखांचे उत्पन्न
Published on: 06 May 2022, 11:28 IST