News

भाऊबंदकी म्हटले म्हणजे थोडीशी तू तू मै मै हे चालूच असते. शेतीच्या बाबतीत म्हटले तर बांध असो किंवा शेतीची मोजणी किंवा रस्ता याबाबतीत बऱ्याचदा वाद विकोपाला जातात. बर्या्चदा कोर्टापर्यंत प्रकरणे पोहोचतात.

Updated on 15 March, 2022 11:32 AM IST

भाऊबंदकी म्हटले म्हणजे थोडीशी तू तू मै मै हे चालूच असते. शेतीच्या बाबतीत म्हटले तर बांध असो किंवा शेतीची मोजणी किंवा रस्ता याबाबतीत बऱ्याचदा वाद विकोपाला जातात. बर्‍याचदा कोर्टापर्यंत प्रकरणे पोहोचतात.

यामधील काही प्रकरणेही गंभीर स्वरूपाच्या असतात तर काही प्रकरणांना काहीसा मजेशीरकंगोरा देखील असतो. असाच भाऊबंदकी च्या वादातून एक मजेशीर किस्सा उस्मानाबाद मध्ये घडला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये माळकरंजा हे गाव आहे. या गावातील महादेव डोलारे नावाच्या शेतकऱ्यानेचक्क विहीर गायब झाल्याची  तक्रार कळंब तहसीलदार यांच्याकडे केली आहे व ही विहीर शोधून देण्याची मागणी कळंब तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

 नेमकी काय आहे हे प्रकरण?

 महादेव डोलारे यांची वडिलोपार्जित एकूण आठ एकर जमीन होती.नंतर या वडिलोपार्जित जमिनीची वाटणी होऊनचार जणांच्या वाट्याला दोनदोनएकर जमीन आली. यात आठ एकर मध्ये एकूण दोन विहिरी होत्या. असे डोलारे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

त्यातील एक विहीर हे महादेव यांच्या वाट्याच्या शेतात दुसरी भावकीच्या शेतात होती. काही दिवसांनी भावकीतील लोकांनी ही विहीर बुजवली आणि कागदोपत्री बदल करत विहीर  गायब केली असल्याचे डोलारे  यांनी तक्रारीत म्हटले आहे.

 या प्रकरणात भाऊबंदकीचा अजब निर्णय

 या तक्रारीनंतर प्रशासन विहिरीच्या शोध लावेल किंवा त्याला काही वेळ लागेल मात्र या दोन भाऊबंदकीचा भांडणात महादेव डोलारे यांच्या शेतात सध्या अस्तित्वात असलेली विहीर देखील दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे.

जोपर्यंत बुजवली विहीर खोदून देत नाही किंवा या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत असलेल्या विहिरीचे देखील पाणी घ्यायचं नाही असा प्रत्यक्ष भांडणीकरारच केला गेला आहे. त्यामुळे विहिरीत पाणी आहे परंतु तरीदेखील पाणी पिकांना घेता येत नसल्याने डोलारे यांची जमीन कोरडवाहू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल काय लागतो हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

English Summary: when well is to be stolen that amazing complaint submit at kalanmb magistrate
Published on: 15 March 2022, 11:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)