News

यंदाचा ऊसाचा गाळप हंगाम खूपच चर्चेत राहिला आहे. 15 ऑक्टोंबरला यंदाचा गाळप हंगाम सुरु झाला होता. आता गाळप अंतिम टप्यात आहे. तरी मात्र, शेतकऱ्यांचा ऊस आजून फडातच आहे.

Updated on 21 February, 2022 9:59 AM IST

यंदाचा ऊसाचा गाळप हंगाम खूपच चर्चेत राहिला आहे. 15 ऑक्टोंबरला यंदाचा गाळप हंगाम सुरु झाला होता. आता गाळप अंतिम टप्यात आहे. तरी मात्र, शेतकऱ्यांचा ऊस आजून फडातच आहे. शेतकऱ्यासमोर आधीच अनेक संकट आहेत. यामध्ये आता आणखी भर पडली आहे. ऊस तोड (Sugarcane Area) झाली नाही त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.

साखर कारखान्यांची संख्या वाढली असताना, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ऊस मात्र फडातच आहे. लागवड झाल्यापासून 12 महिन्यांमध्ये (Sugarcane crushing) ऊसाचे गाळप होणे गरजेचे असते. ऊसाचे वजन आणि दर याचा समतोल राखला जातो. पण आता 14 महिने उलटूनही ऊस शेतातच असल्याने उत्पादनात घट होणार आहे. मांजरा नदीकाठचा भाग तर ग्रीन बेल्ट म्हणूनच ओळखला जात आहे. गेल्या चार वर्षापासून उसाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या कायम आहेत.

सभासद नसणाऱ्यांना प्राधान्य

यंदाचा गाळप हंगाम जोरात चालू आहे. मात्र, जे सभासद आहेत त्यांचा ऊस फडातच आहे. साखर कारखाने अर्थर्जानाचा विचार करुन जे सभासदही नाहीत अशाच शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहेत. अशी अवस्था लातूर जिल्ह्यात आहे. ऊसतोडणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असून ऊसाची तोड होणार की नाही हा प्रश्न आहे.

हे ही वाचा : एफआरपी मिळेना आणि तोडणी वाहतुकीमध्ये लुट थांबेना, फडातलं गाऱ्हाणं आयुक्तांसमोर

जिल्ह्यातील साखर कारखाने

लातूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या हंगामात 11 साखर कारखान्यांचे गाळप हे सुरु होते. यामध्ये मांजरा विकास सहकारी साखर कारखाना, रेणा सहकारी साखर कारखाना, पणगेश्वर साखर कारखाना, सिद्धी सहकारी साखर कारखाना, ट्वेंटीवन 01, ट्वेंटीवन 02, जागृती सहकारी साखर कारखाना, किल्लारी साखर कारखाना, मारोती महाराज सहकारी साखर कारखाना, औसा तालुक्यातील गोंदरी साखर कारखाना, शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर यांचा समावेश आहे. असे असताना हजारो हेक्टरावरील ऊस अजूनही फडातच आहे.

एप्रिल महिन्यापर्यंत हंगाम सुरु राहिल असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रावरील ऊसाची तोड होणार की नाही याची शंका आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कार्यक्षेत्र तसेच लगतच्या भागातील ऊसाची तोड झाल्याशिवाय गाळप बंद करु नये असे आदेश कारखान्यांना दिले आहेत.

English Summary: When the sugar mills are started, the cane bursts
Published on: 21 February 2022, 09:59 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)