सध्या बाजारात टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फटका बसत आहे. असे असताना आता हे दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार हालचाली करीत आहे.
यामध्ये आता कृषी आयुक्तालयाच्या वतीने नुकतीच राज्यातील कृषी अधिकाऱ्यांची यांची बैठक घेण्यात आली. यावेळी टोमॅटोची उपलब्धता यावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत टोमॅटो लागवड, उत्पन्न आणि दर नियंत्रणाबाबत आढावा घेतला. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण 57 हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे 42 हजार हेक्टर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सर्वसाधारण 16 ते 17 हजार हेक्टर क्षेत्र असते.
गोकुळचा चिठ्ठीवरचा कारभार कधी बंद होणार? दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका...
यापासून सर्वसाधारणपणे 10 लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असते. एप्रिल 2022 ते मे 2023 दरम्यान 8 ते 9 रुपये प्रति किलोच्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले.
त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला यांचे नुकसान झाले.
लासलगावमध्ये डाळिंब प्रतिक्रेट २०११ रुपये भाव, शेतकऱ्यांना दिलासा..
त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येते. शेतकरी नविन टोमॅटोची लागवड करत आहेत याबाबत येत्या 7-8 दिवसात वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल.
शेतकरी नेत्यांना मोठा धक्का! राजू शेट्टी, खोत, पाटील यांना ऊस दर नियंत्रण मंडळातून वगळले...
Published on: 14 July 2023, 09:57 IST