Onion News
केंद्र सरकारने कांद्याला जो ४० टक्के कर लावला आहे, तो सरकारने कमी करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. कांद्याला उत्पादन खर्च्याच्या तुलनेत काहीच किंमत मिळत नाही, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. केंद्राने अचानक लावलेल्या कांदा निर्यातशुल्कावर शरद पवारांनी मत व्यक्त केलं आहे. ते बारामतीत बोलत होते.
कांद्यावर लावण्यात आलेल्या निर्यात शुल्कबाबत केंद्र सरकारमधील संबंधित लोकांशी बोलण्यात प्रयत्न केला. पण त्यांच्यासोबत काही कारणांमुळे संपर्क होऊ शकला नाही, अशीही माहिती शरद पवार यांनी दिली आहे.
मी केंद्रीय कृषिमंत्री असताना देखील कधी कांद्यावर एवढा निर्यातशुल्क लावला नाही. तर आता सरकार ४० टक्के शुल्क का लावला आहे? याचा केंद्र सरकारने खुलासा करावा, असंही पवार म्हणालेत.
साखर निर्यातबाबत शरद पवार काय म्हणाले?
केंद्र सरकार साखर निर्यातीवर बंदी घालणार असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर देखील शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. साखर निर्यातीवर जर बंदी घातली तर साखरेचे बाजारभाव कमी होतील. आणि याचा शेतकऱ्यांना फटका बसेल. असं पवार म्हणालेत. याबाबत मी काही लोकांची चर्चा केल्याचे पवार म्हणाले.
Published on: 25 August 2023, 11:53 IST