News

मान्सून 5 ते 6 जून ला केरळमध्ये दाखल होणार आहे. आपण त्याप्रमाणे पुढील 24 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मान्सूनची शाखा सक्रिय होईल.

Updated on 05 June, 2023 2:15 PM IST

मान्सून 5 ते 6 जून ला केरळमध्ये दाखल होणार आहे. आपण त्याप्रमाणे पुढील 24 तासात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मान्सूनची शाखा सक्रिय होईल.

कमी दाबचे पुढे जाऊन 8 ते 9 जूनला चक्री वादळ निर्माण होऊन उत्तर दिशेने प्रवास करील त्याचा परिणाम म्हणून 9 जून पासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे अहमदनगर संभाजी नगर उत्तरे कडे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मान्सून (पूर्व) पावसाला सुरवात होईल.

तसेच मराठवाडा व विदर्भ या भागात देखील पाऊस होईल. राज्यात 12 जून नंत्तर तळ कोकणात मान्सून दाखल होईल. त्यानंत्तर मान्सूनचा प्रवास मंद होईल.

शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना काळजी घ्या! कृषी विभागाकडून सव्वा कोटीचे बोगस बियाणे जप्त

असे असताना मात्र राज्यात पाऊस काही भागात सुरूच राहील जूनमध्ये कोकण विभागात पाऊस अधिक राहील. 22 जून पर्यंत विदर्भ आणि मध्य भारतात मान्सून सक्रिय होईल.

काळ्या हळदीची लागवड आहे फायदेशीर, शेतकरी होईल मालामाल..

या काळात राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र 5 जून जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजी नगर अहमदनगर उत्तर पुणे उत्तर सर्वत्र ढगाळ हवामान मान्सून पूर्व पाऊस होईल. तसेच जून च्या दुसऱ्या आठवड्यात देखील वळिव पाऊस 10 जून पर्यंत उत्तर महाराष्ट्र पावसाचा जोर वाढेल.

भातशेतीसाठी कशाची गरज? मान्सूनच्या तोंडावर जाणून घ्या सर्वकाही..
कारल्याची शेती आहे फायदेशीर, जाणून घ्या..
'काळा मुळा' आरोग्यासाठी फायदेशीर, शेतीतून मिळणार बंपर कमाई, जाणून घ्या सर्व काही

English Summary: When and where will monsoon enter the state? Find out...
Published on: 05 June 2023, 02:15 IST