गहू पिकाचा विचार केला तर हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून भारतात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गव्हाची लागवड ही रब्बी हंगामात केली जाते. गहू हे आहारातील एक प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे बाजारपेठेत देखील गव्हाला चांगली मागणी असते. या पार्श्वभूमीवर गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी असून म्हणजे यावर्षी देखील गव्हाचे बाजार भाव तेजीत राहतील असा एक अंदाज जाणकारांनी वर्तवला आहे. जर आपण मागच्या तीन ते चार महिन्यापूर्वी गव्हाच्या बाजारभावाचा विचार केला तर तो 2300 रुपये प्रति क्विंटल इतका होता.
परंतु आता त्यामध्ये तब्बल सहाशे रुपयांची वाढ होत 2900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात आहे. त्यामुळे निश्चितच गहू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसून येत आहे. परंतु हे दर किती दिवस टिकतील याबाबतीत जाणकारांचा अंदाज पाहिला तर त्यांच्या मते जोपर्यंत सरकार खुल्या बाजारामध्ये गहू उतरवत नाही तोपर्यंत दर कमी होणार नाही. त्यामुळे यावर्षी गव्हू शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा करून देईल हे निश्चित.
सध्या एकंदरीत आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत गव्हाची स्थिती
रशिया व युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाले व त्याचा थेट परिणाम हा गव्हाच्या जागतिक पुरवठ्यावर झाला. या युद्धामुळे गव्हाचा पुरवठा हा कमी झाला व मागणी व पुरवठ्याचे चक्र व्यस्त झाल्यामुळे साहजिकच दरात वाढ झाली. याच कालावधीमध्ये भारतीय बाजारात गहू आला. तसेच गव्हाचा विचार केला तर देशांतर्गत साठा हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे गव्हाचे निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर झाली.
परंतु यामध्ये निर्यात मोठ्या प्रमाणावर केली गेली परंतु गहू उत्पादनात मागच्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळे घट आली. त्यामुळे देशांतर्गत खुल्या बाजारामध्ये गव्हाचे दर हमीभावापेक्षा देखील जास्त राहिले. त्यामुळे हा हमीभाव केंद्रांवर गव्हाची विक्री झाली नाही व सरकारकडे खूपच कमी बफर स्टॉक शिल्लक राहीला.
सध्या परिस्थितीत बाजारपेठेत गव्हाची आवक कमी झाली असून तसेच सरकारकडील बफर स्टॉकमध्ये देखील गहू नसल्यामुळे दरातील तेजी कमी होत नसल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण यावे यासाठी शासनाकडून गव्हाची निर्यात देखील थांबवण्यात आली. तसेच गव्हापासून जे काही उत्पादने निर्माण केली जातात त्यांचे देखील निर्यात थांबवली गेली.
परंतु साठवणूकदार आणि शेतकरी बांधवांनी गव्हाचे वाढते दर पाहून विक्री थांबवली व गव्हाचे दर यामुळे वाढतच राहिले. सगळ्या परिस्थितीचा परिणाम हा दर वाढीवर झाला असून सध्या गव्हाच्या दर 2900 रुपये प्रति क्विंटलवर आहेत. दरम्यान गहू प्रक्रिया उद्योगाकडून सरकारकडे खुल्या बाजारात स्टॉकमधील गहू विक्री करण्याचे आवाहन केले जात आहे.
परंतु शासनाच्या बफर स्टॉकमध्ये देखील गहू हवे त्या प्रमाणात शिल्लक नसल्यामुळे शासनाने देखील खुल्या बाजारात गहू विक्रीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रक्रिया उद्योगातील जाणकार लोकांच्या मताचा विचार केला तर शासनाने जर बफर स्टॉक मधील गहू मार्केटमध्ये उतरवला नाही तर गव्हाला कधी नव्हे एवढे दर मिळन्याची शक्यता आहे. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या परिस्थितीवरून गहू हा शेतकऱ्यांना मालामाल बनवेल यात शंकाच नाही.
नक्की वाचा:जुन्या कांद्याला मिळतोय कवडीमोल भाव; नवीन कांद्याला मिळतोय हा दर...
Published on: 14 December 2022, 05:00 IST