गहू आणि हरभरा ही रब्बी हंगामातील सगळ्यात महत्त्वाची पिके आहेत.रब्बी हंगामातील गव्हाची कापणी सध्या सुरू असून काही प्रमाणात गहू बाजारात विक्रीसाठी येत आहे.
तसं पाहायला गेलं तर गव्हाची आवक प्रमाणापेक्षा कमी आहे. परंतु तरीदेखील गव्हाचे भावअपेक्षेपेक्षा खूपच कमी आहेत. गव्हाच्या पिकाला चांगली पाण्याची व्यवस्था लागते. सिंचनावर आधारित पीक असून त्याची पेरणी जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत करता येते. यावर्षीचा विचार केला तर गव्हाचे लागवड क्षेत्र खूपच कमी आहे. महत्त्वाचे म्हणजेजानेवारी आणि मार्च मधीलझालेल्या हवामानातील बदल आणि गारपिटीचा देखीलया पिकाला प्रथमच तडाखा बसला नाही.
नक्की वाचा:ठिंबक सिंचन पद्धतीचे आपल्याला महिती नसलेले अप्रतिम फायदे
त्यामुळे उत्पादन बऱ्यापैकी आले व हा गहू बाजारात विक्रीसाठी देखील येत आहे.तसेच आपल्याला माहित आहेच की,रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळेआपल्याकडे गव्हाला निर्यातीची देखील चांगली संधी आहे.
त्यामुळे ही सगळी परिस्थिती गव्हाची भाव वाढतील यासाठी पोषक आहे. परंतु ही अपेक्षा फोल ठरताना दिसत आहे. जर आपण ओपन मार्केटचा विचार केला तर गव्हाच्या भावाने निराशा केली आहे. यामागील सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे गव्हाची करण्यात येत असलेली खेडा खरेदी हे होय. या खरेदी मध्ये मध्यप्रदेशातील काही व्यापारी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये येत असून गहू खरेदी करीत आहेत. हे व्यापारी शेतकऱ्यांना जागेवरदोन हजार रुपये प्रति क्विंटलएवढा दर शेतकऱ्यांना देत आहे. त्यामुळे जागेवर दोन हजार रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकरी देखील या व्यापाऱ्यांना गहू विकत आहेत.
हे आहेत पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये जाणून घेऊ सविस्तर
शेतकऱ्यांकडून या गव्हाची खरेदी करून व्यापारी त्यावर मिलमध्ये साफसफाई व पॅकिंग करून तोच गहू पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवित आहेत.
या मधील वैशिष्टपुर्ण गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांकडून हा गहू 2050 ते एकवीसशे रुपयेप्रति क्विंटल दराने खरेदी केला जात असून तोच गहू दोन हजार 700 रुपयांपर्यंत बाजारात विकला जात आहे.त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून बरेच गहू उत्पादक शेतकरी खुल्या बाजारामध्ये गव्हाचे भाव वाढतील अशी आशा ठेवून आहेत परंतु व्यापारी करीत असलेल्या खेडा खरेदी मधून या अपेक्षेवर पाणी फिरत आहे.
Published on: 19 April 2022, 02:52 IST