राजस्थानचे शेतकऱ्यांसाठी एमएसपीवर आधारित महत्वाची बातमी आहे. येथे चालू रब्बी हंगाम वर्ष २०२१ ते २२ यावर्षात गव्हाची किमान आधारभूत किंमत १९७५ रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली गेली आहे. खाद्य आणि नागरिक आपूर्ति विभागाचे सचिव नवीन जैन यांनी किमान आधारभूत किमतीमध्ये गहू खरेदी विषयी केलेल्या तयारी संबंधी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ही माहिती दिली.
जैन म्हणाले की, कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या कृषी उत्पादन कार्यक्रमाद्वारे राज्यात जवळ-जवळ ११८ लाख मेट्रिक टन गहू उत्पादन होण्याची शक्यता आहे. जैन म्हणाले की, वर्ष २०२०-२१ मध्ये की ई प्रॉक्योरमेंत द्वारे कोणतेही काम झाले नाही परंतु या रब्बी हंगाम वर्ष २०२१ ते २२ मध्ये इ प्रॉक्योरमेंत द्वारे सगळी कार्यवाही ठरवलेल्या वेळेत पूर्ण केली जाईल व त्यासंबंधीचे निर्देश अधिकार्यांना देण्यात आले आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, ही सगळी खरेदीची प्रक्रिया प्रभावी आणि कार्यक्षमपणे राबवण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीद्वारे दिशानिर्देश देण्यात आले आहेत. पुढे त्यांनी सांगितले की भारत सरकारच्या परिवहन दरानुसार तसेच बाजार लेबर चार्जेस निश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक आयोजित केली गेली.
या बैठकीत हे दर निश्चितीसाठी तज्ञांची उपसमिती गठीत केली गेली आहे. या उपसमिती द्वारे येणाऱ्या दोन फेब्रुवारीला राज्यस्तरीय समितीला अहवाल सादर करेल. त्या अहवालाच्या आधारे आगामी रब्बी हंगामा वर्ष २०२१ ते २२ मध्ये अन्नधान्याच्या किंमती निश्चित केल्या जातील. गव्हाच्या खरेदीशी निगडीत असलेली विविध गोष्टी आणि पैलूंवर विस्तारपूर्वक चर्चा या बैठकीत केली गेली. या बैठकीला अतिरिक्त खाद्य आयुक्त अनिल कुमार अग्रवाल, एफसीआयचे महाप्रबंधक संजीव भास्कर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Published on: 15 January 2021, 11:12 IST