रब्बी हंगामात पोषक वातावरण तयार झाले असल्यामुळे मोठा बदल झाला. उत्पादनात तर वाढ झालीच आहे पण त्या सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम गव्हाच्या किमतीवर झाला असल्यामुळे गहू उत्पादकांवर चांगलेच दिवस उजाडले आहेत. हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारपेठेत गव्हाला ४ पटीने दर आहे. यंदा पंजाब मधील सोने मोती या गव्हाच्या वाणाचे सोनच झाले आहे. पंजाब मधील सोने मोती हा वान खूप जुना आहे. लोकांना हा गहू खूप पसंद पडलेला आहे जे की ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळी सोने आणि मोती गव्हाचे उत्पादन घेतले त्यावेळी सर्वसामान्य वानापेक्षा त्यांना बाजारात या वाणाला अधीकचा दर भेटला.
सोनं-मोत्या’च्या वाणाचे वेगळेपण काय?
मागील अनेक वर्षांपासून पंजाबमधे सोने मोती हा गव्हाचा वाण प्रचलित आहे. या वाणामध्ये ग्लुटेन चे प्रमाण कमी प्रमाणत असते. जे की सोने मोती या गव्हाच्या वानामध्ये ग्लाइसेमिकचे प्रमाण आणि फॉलिक अॅसिडचे जास्त प्रमाणत असते. सोने मोती ही गव्हाची जात आपल्यासाठी पौष्टिक आणि प्राचीन जात मानली जाते. काळाच्या ओघात गव्हाच्या अनेक जाती आलेल्या आहेत मात्र या वाणाचे महत्व हे कायम ठरलेले आहे.
गव्हाला प्रति क्विंटल 8 हजाराचा दर :-
दिवसेंदिवस पंजाब मध्ये सोने मोती या गव्हाच्या किमतीत वाढच होत चाललेली आहे. सध्या खुल्या बाजारात या गव्हाच्या वानाला प्रति क्विंटल ८ हजार रुपये दर मिळत आहे. जे नागरिक आपल्या आरोग्याची मोठ्या प्रमाणात काळजी घेतात ते नागरिक या गव्हाच्या वानाला मोठी पसंद देतात. पंजाब मध्ये पेरणी दरम्यानच हा गहू बुकिंग केला जातो एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पंजाब मधील खन्ना येथील बहोमजरा गावामधील हरपालसिंग भट्टी या शेतकऱ्याने १० शेतकरी उत्पादक गट तयार केले आहेत. या गटाने ३० एकरामध्ये सोने मोती या गव्हाच्या वाणाचे उत्पादन घेतात.
पंजाब तसेच इतर राज्ये लोकप्रिय होत आहेत :-
हजारो वर्षे सोने मोती हा जुना वाण असल्याचे सांगितले जात आहे. जो की हा वाण आता मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय मनाला जात आहे. प्रति एकर सोने मोती या वाणाचे उत्पादन ८ क्विंटल निघते. तर गव्हाच्या इतर लोकप्रिय वाणाचे एकरी २० ते २१ क्विंटल उत्पादन भेटते. मात्र शेतकरी अजून सुद्धा सोने मोती या गव्हाच्या वणापासून चार पटीने पैसे काढत आहेत जे अजूनही सर्वसामान्य गव्हाच्या वानांतून निघत नाही.
Published on: 10 May 2022, 05:05 IST