News

शेती समजून घेताना या लेख मालिकेत आपण शेतीसंबंधिची माहिती घेणार आहोत. शेती आणि शेती संबंधित असलेल्या कायदेशीर बाबींविषयी आपण माहिती आपल्याला मिळणार आहे. आजच्या लेखात आपण जमिनीसंबंधिच्या नोंदवह्याची माहिती घेणार आहोत.

Updated on 01 July, 2021 2:31 PM IST

शेती समजून घेताना या लेख मालिकेत आपण शेतीसंबंधिची माहिती  घेणार  आहोत.  शेती  आणि  शेती  संबंधित असलेल्या कायदेशीर बाबींविषयी आपण माहिती आपल्याला मिळणार आहे.  आजच्या लेखात आपण जमिनीसंबंधिच्या नोंदवह्याची माहिती घेणार आहोत.  सध्याच्या परिस्थितीत शहरांची वाढ मोठ्या प्रमाणात होत चालली असून माणसा शहरांकडे राहिला निघाली आहेत असं असलं तरी आपल्या भारत देशातील जमिनी, रेकॉर्ड्स व त्यासंबंधीची एकूण शासकीय व्यवस्था असते गाव आणि गावची व्यवस्था याला आधारभूत मानून तयार करण्यात आली असते

अगदी आपल्या देशावर मुगल शासक यांचे राज्य होते तसेच इंग्रजांच्या कार्यकाळात पर्यंत जे काही जमिनीशी संबंधित सरकार दरबारीची मशिनरी उभी झाली व राबवल्या गेली तिचा प्रभाव आजही तसाच राहिला आहे.  आजही त्या जुन्या मशिनरीज वर( रेवेन्यू डिपार्टमेंट) आधारित कागदपत्रांना धरून आजही आपल्या जमीनीचे व्यवहार व संबंधित बदल वगैरे होत असतात. तर जमिनी संबंधित कागदपत्र कसे असतात ते बघुया.

1 -गाव नमुना नंबर 2- या नोंदवहीत बिन शेतीची जमीन याची नोंद असते.

2 - गाव नमुना नंबर 3- या नोंदवहीत देवस्थान( दुमाला जमीन) याची नोंद असते.

3 - गाव नमुना नंबर 4- या वहीत, विलंब शुल्क होणारा महसूल याच्या नोंदी केल्या जातात.

4-  गाव नमुना नंबर 5- या नोंदवहीत गावाचे क्षेत्रफळ,  सीमा, जिल्हा परिषदेचे कर, शिक्षण कर इत्यादीची नोंद असते.

5-  गाव नमुना नंबर 6= या नोंदवहीत खरेदी-विक्री, फेरफार नोंदी, वारस नोंदी यांची माहिती असते.

हेही वाचा:तौक्ते नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला; मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांकडून निधी मंजूर

अ - तक्रारी व हरकती( मंजूर अथवा नामंजूर संबंधित) नोंद या वहीत केल्या जातात.

ब- मयत झालेल्या माणसाच्या वारसाच्या नोंदी या वहीत केल्या जातात.

क - पोट हिस्से, पोटखराब, भूसंपादन यांच्या नोंदी असतात.

6= गाव नमुना नंबर 7- या वहीत खातेदाराचे नाव, क्षेत्रफळ, सिटी सर्वे नंबर, गट नंबर, आकार इत्यादी माहिती असते.

अ – कुळाची माहिती व कुळ वहीवाटीचा प्रकार नोंदविलेला असतो.

7- गाव नमुना नंबर 8- खाते उतारा म्हणजे जेवढे काही सातबारा असतील त्याचे सर्व एकत्र नोंद 8 अ मध्ये केली जाते.

8- गाव नमुना नंबर 9- शासनाच्या पावत्या, कर संबंधीची माहिती नोंदवलेली असते.

9- गाव नमुना नंबर 10- या वहीत शासनाच्या एकूण महसुलाची नोंद असते.

10- गाव नमुना नंबर 11- त्या वहीत सिटीसर्वे प्रमाणे किंवा गट नंबर प्रमाणे पीकपाणी व झाडांची माहिती यांची नोंद पाहायला  मिळते.

ही वाचा:शेतकऱ्यांसाठी कायदा येणार, शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास तीन वर्षे कारावास

11-  गाव नमुना नंबर 12 व 15- रित म्हणजेच कसण्याचा  पद्धती जसे की अंग मेहनतीची जमीन कसली जाते आहे का? मालक स्वतः जमीन कसतो का? किंवा इतर कुणाला कसायला देतो का? या सर्व नोंदी या वहीत नमूद असतात.

12-  गाव नमुना नंबर 13- या वहीत गावाची लोकसंख्या व जनावरांची संख्या याची नोंद असते.  या नोंदींची जबाबदारी गावाच्या पटवारी याच्यावर असते.

13-  गाव नमुना नंबर 14- जमीन मालकाच्या व्यतिरिक्त अजून कोणी जमीन कसत असल्यास या वहीत त्याचे नाव असते.

14- गाव नमुना नंबर 16- माहिती पुस्तिका/ कर आकारणी याच्या बद्दलची माहिती या वहीत असते.

15- गाव नमुना नंबर19- सरकारी मालमत्तेचे संपूर्ण माहिती याची नोंद या वहीत केलेली असते. 

 

जमिनीसंबंधीची वरील वह्या रेवेन्यू खाते मेंटेन करत असते. आपल्याला या वह्यांमध्ये दिलेली माहिती जर काढायचे असेल तर ती कोणत्या वहीत कसली माहिती असते याचे ज्ञान असावं लागतं ते असलं की आपण पटवारी याला अमुक ती वही दाखव की त्या वहीच्या अमुक-तमुक पानाचे उतारे दे असं सांगू शकतो.. त्यामुळे जमिनीचे व्यवहार करताना अज्ञानामुळे होणारी फसवणूक टाळली जाऊ शकते.

स्त्रोत- मायबोली मोबाईल ॲप

English Summary: What is the registering, find out! Land related documents information
Published on: 21 August 2020, 11:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)