News

वादळ आले की वादळी गोष्टी घडतात. अशीच एक घटना नुकतीच आंध्र प्रदेशात घडली आहे. सध्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर असानी नावाचे वादळ धुमसत आहे. या वादळाच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर एक सोन्याचा रथ वाहून आला आहे.

Updated on 13 May, 2022 12:49 PM IST

वादळ आले की वादळी गोष्टी घडतात. अशीच एक घटना नुकतीच आंध्र प्रदेशात घडली आहे. सध्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर असानी नावाचे वादळ धुमसत आहे. या वादळाच्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर एक सोन्याचा रथ वाहून आला आहे. स्थानिक लोक याला 'राजा मंदिरम' म्हणत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यातील मच्छिमारांनी प्रथम रथ पाहिला. जोरदार वारा असतानाही लोक रथ ओढताना दिसतात. एएनआयने दिलेल्या व्हिडिओमध्ये ही दृश्ये दिसत आहेत.

स्थानिक लोक याला 'राजा मंदिरम' म्हणत आहेत. श्रीकाकुलम जिल्ह्यातील मच्छिमारांनी सर्वात आधी हा रथ पाहिला. हा रथ पाहिल्यावर वादळी लाटा येत असूनही लोक तो रथ ओढताना दिसत आहेत. ANI ने दिलेल्या व्हीडिओत ही दृश्यं दिसत आहेत.  

त्यांच्या मदतीने स्थानिक मरीन पोलिसांनी या रथाला किनाऱ्यावर ओढलं. मरीन पोलिसांच्या मते त्यावरची अक्षरं म्यानमारच्या भाषेतील असावी. हा रथ मरीन पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तो कुठून आला  याचा तपास सुरू आहे. गुप्तचर विभागालाही या रथाची माहिती देण्यात आली आहे. हा रथ पहायला आजूबाजूच्या लोकांची गर्दी जमली आहे.

स्थानिक बोटीवाल्यांनी लावलेल्या अंदाजानुसार, चक्रीवादळाच्या जोरावर निर्माण झालेल्या भरतीच्या लाटांनी रथ किनाऱ्यावर पोहोचला असावा. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पाहिले आणि दोरीने बांधून किनाऱ्यावर आणले. हा सुवर्ण रथ पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या संख्येने किनाऱ्यावर येत असून हा रथ लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे.

एशियानेट न्यूजनुसार, रथ मंदिराच्या आकाराचा असून तो अतिशय भव्य आणि सोनेरी दिसत आहे. समुद्रातून रथ बाहेर आल्याचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांमध्ये धार्मिक भावनेची लाट असून शेकडो नागरिक गूढ रथाला मानवंदना देण्यासाठी दाखल होत आहेत. त्याची वास्तू प्राचीन इमारतींसारखीच आहे. मात्र, या गूढ रथाबाबत अद्याप निश्चित काहीही सांगण्यात आलेले नाही.

महत्वाच्या बातम्या 
मोफत रेशनबाबत सरकारची मोठी घोषणा, आता 'या' लोकांना मोफत मिळणार नाही रेशन

English Summary: What is the mystery of the golden chariot that was swept away in the cyclone?
Published on: 13 May 2022, 12:49 IST