News

ॲझोलाच्या वाढीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी लागणार पोषक वातावरण भातशेतीत उपलब्ध होते. खूप कमी वेळात ॲझोलाची वाढ झपाट्याने होते.

Updated on 05 June, 2023 2:02 PM IST

ॲझोलाच्या वाढीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे त्याच्या वाढीसाठी लागणार पोषक वातावरण भातशेतीत उपलब्ध होते. खूप कमी वेळात ॲझोलाची वाढ झपाट्याने होते.

भात रोप लावणीनंतर जेव्हा युरिया भावापरला जातो त्याच वेळी पाण्यामध्ये ११ ते ५४ टक्के त्याचा निचरा होतो. भात पिकाला पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये उपलब्ध होत नाहीत. भातशेतीत नत्राचा प्रभावी उपयोग होण्यासाठी ॲझोला हा चांगला पर्याय आहे.

ॲझोलामध्ये नत्राचे प्रमाण २-५ टक्के आणि पालाश प्रमाण ०.३-६ टक्के एवढे असते. ॲझोलाद्वारे स्थिर केलेले ५ टक्के नत्र वाढणाऱ्या भाताच्या रोपांना लगेच उपलब्ध होते आणि उर्वरित ९५ टक्के ॲझोलामध्येच शेवटपर्यंत राहते.

अरबी समुद्रात मॉन्सून दाखल, लवकरच राज्यात दाखल होण्याची शक्यता..

जेव्हा ॲझोला शेतामध्ये कुजायला लागतो, त्यावेळी त्यातील नत्राचे विघटन होऊन अमोनिया सोडला जातो आणि तेच भातासाठी जैविक नत्र खत म्हणून उपलब्ध होते. अँझोला २०-२५ दिवसांत २०-४० किलो नत्र प्रति हेक्टरी भातशेतीत स्थिर करतो.

ॲझोला पिनाटा ही भारतात सहज उपलब्ध होणारी ॲझोलाची जात दिवसाला ०.३ ते ०.६ किलो नत्र हेक्टरी स्थिर करते. ॲझोलाची वाढ शाकीय प्रजननाने होते. त्यामुळे अँझोला छोट्या टाक्यांमध्ये वाढवून वर्षभर संवर्धन करता येते. अझोलाच्या वाढीसाठी सरासरी २५ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. उच्च तापमान ॲझोला सहन करू शकत नाही.

शेतकऱ्यांनो बियाणे खरेदी करताना काळजी घ्या! कृषी विभागाकडून सव्वा कोटीचे बोगस बियाणे जप्त

सर्वसाधारणपणे २.५ ×१.५ × ०.२ मीटर आकाराचे वाफे तयार करून त्यामध्ये प्लॅस्टिक पेपर अंथरावा त्यानंतर साधारणतः १० किलो सुपीक चाळलेली माती पसरावी. वाफ्यामध्ये १० सेंमी पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये ३० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण पाच किलो शेणात मिसळून आतील माती ढवळावी. माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात एक किलो ॲझोला पसरावा.

साधारणपणे ८-१० दिवसात ॲझोलाची भरपूर वाढ होते. त्याचा पाण्यावर चांगला थर जमतो. सरासरी २-३ आठवड्यांत पूर्ण शेतात सुमारे २० टन ॲझोलाची वाढ होते. पूर्ण वाढीनंतर नांगरणी करून ॲझोला जमिनीत गाडून त्यानंतर तिथे भात रोपांची लावणी केली जाते. गाडल्यानंतर काही ॲझोला शेतात राहतो, त्याची वाढ होतच राहते.

कारल्याची शेती आहे फायदेशीर, जाणून घ्या..
'काळा मुळा' आरोग्यासाठी फायदेशीर, शेतीतून मिळणार बंपर कमाई, जाणून घ्या सर्व काही
काळ्या हळदीची लागवड आहे फायदेशीर, शेतकरी होईल मालामाल..

English Summary: What is needed for rice farming? Know everything about Monsoon..
Published on: 05 June 2023, 02:02 IST