एनए म्हणजे काय रे भाऊ ? ; कसा कराल जमिनीचा एनए, जाणून घ्या पद्धत

09 August 2020 06:21 PM


पुणे (शेखर पायगुडे) :  राज्याचा जसजसा विकास होत आहे, त्याच्याबरोबर विकासासाठी, राहण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर  जागेची मागणी वाढत आहे.  परंतु जेव्हा एखाद्या शेतीत  असे  प्रकल्प करायचे असेल तर ते राज्याच्या नियमानुसार करता येत नाही. त्यासाठी आगोदर शेत जमिनीचे अकृषी  म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे एनए करावे लागते.  अनेक सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहित नसते. आज आपण एनए करण्यासाठी कोणती प्रत्रत आवश्यक  असतेती कशी करावी लागतेया विषयी  माहिती घेऊ.

महाराष्ट्र  जमीन  महसूल ( कृषी जमिनीचे अकृषी कामिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९  नुसार  शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच  विकास कामाकरिता येत नाही.  त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.

एनए करण्यासाठी  आवश्यक असणारी कागदपत्रे

१) जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा  फॉर्म भरून त्यावर कोर्टाची ५ रुपयांचा स्टॅम्प.

२)  जमिनीचा ७/१२ च्या उताऱ्याचा ४ झेरॉक्स.

३)  जमिनीचा फेरफार उतारा.

४)  जर तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड  उपलब्ध नसेल तर  मसूल  अधिकारी ( तलाठी किंवा तसीलदार) यांच्याकडून  जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र घेणे.

५) जमिनीचा ८ अ चा  उतारा.

६)  तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा  नकाशा.

७)  जर इमारतीसाठी एनए करायचे असेल तर  बिल्डिंग प्लॅनच्या ८ प्रती.

८)  जर जमीन कोनट्याही प्रकल्पाच्या आड येत  नाही याची खातरजमा करण्यासाठी चालू  ७\१२ उतारा.

९)  जर  तुमची जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय  महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये  येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण  यांच्याकडून ना  हरकत प्रमाणपत्र घेणे

१०) जर तुम्ही ग्रामीण भागात असाल  तर ग्राम पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, जर शहरी भागात असाल तर महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र.

११)  जर जमीन बॉंम्बे वहिवाट आणि शेती कायदा १९४८ अंतर्गत असेल तर  एनएसाठी परवानगी ४३/६३ नुसार मिळेल.

१२) जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सोसायटीकडून कोणतेही कर्ज किंवा भरणा नाही हे प्रमाणपत्र आवश्यक.

१३)  जी जमीन एनए  करायची आहे ती  कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पसाठी  घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही  असे सांगणारे तलाठयाचे पत्र.

जमिनीचे एनए  करताना सरकारला भरावा लागणारा नजराणा

१) जर  शेत जमिनीचे  रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असेल तर  रेडी रेकनर ( थोड्यक्यात सरकारने ठरवलेला भाव) नुसार  जमिनीच्या ५०%  नजराना भरावा लागणार.

२)  जर शेतजमिनीचे व्यवसायिक जमिनीत रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजाभवाच्या ७५%  नजराणा भरावा लागणार.

३)  जर शेत जमिनीचे निम- सरकारी जागेत रूपांतर  करायचे असेल तर जमिनीच्या  बाजारभावाच्या २०% नजराणा भरावा लागणार.

४)  जर  जर  राहवासी एनए  असेल तर तिचे औद्योगिकमध्ये  रूपांतर करायचे असेल तर जमिनीच्या  किमतीच्या २०% नजराणा.

( जमीनीची बाजारभावानुसार किंमत ही जमीन अधिग्रहण कायद्यात ठरवलेली आहे)

 


आता एनए अर्ज कसा करावा

१)  जिल्हाधिकारी कार्यलयात अर्ज करावा.

२)  अर्ज  मिळाल्यावर जिल्हाधिकारी ७  दिवसात ताहिलदाराना अर्ज पाठवतात.

३)  ताहसीलदार  अर्जाची छाननी करतात.

४) तहसीलदार तोच व्यक्ती जमिनीचा मालक आहे कि नाही हे पाहतात, जर कुठे पैसे  नाहीत ते पाहताततलाठयांकडून जमिनीची चौकशीकरून घेतात.

५)  तहसीलदार हे जमीन एनए झाल्यानंतर कोणत्या पर्यावरणीय  अडचणी किंवा  कोणत्या प्रकल्पाला धोका असणार  नाही ना हे पाहतात.

६)  ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हधिकारी  जमीन रूपांतरांची ऑर्डर किंवा  आदेश काढतात.

७)  त्यानंतर  तलाठी. कार्यालयात जमिनीची एनए  अशी नोंद  होती.

महत्वाची सूचना : एनए झालेली जमीनाचा त्या -त्या कामासाठी  उपयोग झाला  नाही तर तर तिचा एनए  म्हणून नोंद  रद्द होते आणि तुम्ही  भरलेला नजराणा  सरकार जमा होतो.

What is NA नॉन ऍग्रिकल्चरल Non-agricultural Non-agricultural land नॉन ऍग्रिकल्चरल जमीन जमीन एनए
English Summary: What is NA, ? Learn how to do NA of the land, And method

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.