एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा किमान आधारभूत किंमत होय. केंद्र सरकार पिकांसाठी किमान किंमत ठरवत असते यालाच एमएसपी म्हणतात. बाजारपेठेत जर पिकांची किंमत कमी झाली तर सरकार शेतकऱ्यांना एम एसपि नुसार पैसे देते.
त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची निश्चित किंमत,त्यांच्या पिकांची किंमत किती आहे याची माहिती मिळते. या लेखामध्ये आपण एमएसपी कोण ठरवते आणि कसे ठरवले जाते याबद्दल माहिती घेऊ.
एम एस पी कोण ठरवते?
पिकांची एम एस पी कृषी खर्च आणि किंमत आयोग याद्वारे निश्चित केली जाते.पिकांच्या लागवडीचा खर्च आणि इतर बाबींच्या आधारे पिकांची किमान किंमत निश्चित करून आयोग आपल्या सूचना सरकारला पाठवत असतो.
एम एस पी कशी ठरवली जाते?
- किमान आधारभूत किंमत ठरवण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना म्हणजेच व्हेरिएबल वापरले जातात.A2, A2+FL आणि C2 यांचा समावेश आहे.
- A2 मध्ये अशाप्रकाराचे खर्च मोजले जातात जे शेतकरी आपल्या खिशातून देतात. यामध्ये खत, बियाणे,विज, पाणी,मजुरी यावर होणारा खर्च यामध्ये येतो यालाच इनपुट कॉस्ट असे म्हणतात. म्हणजे त्यामध्ये पेरणीपासून ते कापणीपर्यंत त्याचा पिकांचा सगळा खर्च समाविष्ट होतो.
- A2+FL या संकल्पनेत पिकांच्या पेरणीपासून ते कापणी पर्यंतचा तसेच संबंधित शेतकरी कुटुंबाचा कष्टाचा ही समावेश यामध्ये केला जातो. कौटुंबिक श्रम म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी शेतीत केलेल्या कामाची मजुरी यामध्ये समाविष्ट केली जाते.
- शेतकऱ्यांनी जर शेतातील काम मजुरांमार्फत करून घेतले तर त्यांना मजुरी द्यावी लागेल.तसेच घरातील सदस्यांनी देखील शेतात काम केले तर त्यांनाही मजुरी द्यावी.
- C2 या संकल्पनेमध्ये पेरणी ते काढणीचा खर्च तसेच जमिनीचे भाडे आणि त्यावरील व्याज यांचा समावेश होतो.तसेच शेतीसाठी लागणाऱ्या यंत्रांची खरेदी वर शेतकऱ्यांनी जी रक्कम गुंतवली आहेत्यावरील व्याजाचा यामध्ये समावेश आहे. म्हणजे सांगायचे झाले तर शेतीला लागणाऱ्या खर्चाचा व्यतिरिक्त जमीन आणि त्यावरील भांडवल व या भांडवलावर व्याज देखील यामध्ये ठरवले जाते.
Published on: 05 February 2022, 09:51 IST