राज्यात सध्या हलाल विरूद्ध झटका मांस असा नवा वाद पेटला आहे. कारण राज्याचे मत्स्य मंत्री नितेश राणे यांनी राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी 'मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम' नावाचं पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता सर्व नोंदणीकृत मांस विक्रेत्यांना 'मल्हार प्रमाणपत्र' दिलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र फक्त हिंदूंनाच दिलं जाणार आहे. तर चला जाणून घेऊयात मल्हार मटन, हलाल मटन आणि झटका मटन काय आहे.
मटनासाठी प्राणी कापण्याच्या प्रामुख्याने दोन पद्धती आहेत एक म्हणजे हलाल आणि दुसरी झटका. या दोन शब्दातच तुम्हाला समजल असेल. या प्राणी कापण्याच्या पध्दतीवरुन हलाल मटन आणि झटका मटन असे दोन प्रकार पडले.
तर आता पाहूयात हलाल मटन म्हणजे काय
हलाल मटण पद्धतीत प्राण्याच्या मानेवर धारदार चाकू फिरवला जातो. पण प्राण्याचे डोकं शरीरापासून वेगळं केलं जात नाही. श्वासनलिका कापली गेल्याने शरीरातील सगळं रक्त बाहेर पडतं आणि तडफडून त्या प्राण्याचा मृत्यू होतो. या हलाल पद्धतीने प्राणी कापण्यासाठी जमीयत उल उलेमा ए हिंद यांच्या देखरेखीखाली प्रमाणपत्र दिलं जातं.
तर आता आपण पाहूयात झटका मटन म्हणजे काय
झटका पद्धतीत ज्या प्राण्याचे मास करायचे आहे त्या प्राणी एका झटक्यात कापला जातो. अर्थातच त्या प्राण्याचे शीर एका झटक्यात शरीरापासून दूर केले जाते. यामुळे प्राण्याची तटफड होत नाही. शरीरातील रक्त बाहेर येत नाही. या पद्धतीत प्राण्याला बेशुद्धही केलं जातं. या पद्धतीने तयार केलेलं मटण म्हणजे झटका मटण. शीख समुदाय आणि हिंदू समुदाय प्राणी कापण्यासाठी ही पद्धत वापरतात.
तर आता पाहूयात नेमके कोणते मांस खाल्ले पाहिजे
जेव्हा एखाद्या प्राण्याला एकाच फटक्याने लवकर मारले जाते तेव्हा रक्त गोठण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. यामुळे दुखापतीच्या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात, ज्या प्राण्यांच्या संपूर्ण शरीरात पसरतात. त्यामुळे, प्राण्यांमधून रक्त पूर्णपणे बाहेर पडू शकत नाही. /यामुळे जे मास आहे त्या भागात ते रक्त गोठते. ज्यामुळे मांस कठीण होते आणि अतिरिक्त रक्तामुळे ते जास्त काळ त्याची गुणवत्ता राखू शकत नाही, म्हणजेच ते लवकर खराब होते.
मुस्लिम लोक झटका मटन का खात नाहीत?
इस्लामी धार्मिक नेत्यांच्या मते, झटका पद्धतीत प्राण्याच्या शरीरातून रक्त पूर्णपणे बाहेर पडत नाही आणि जर त्या प्राण्याच्या रक्तात काही आजार असेल तर त्याचे मांस खाणे हानिकारक ठरू शकते. तसेच हलाल पद्धतीत प्राण्याच्या शरीरातून रक्त पूर्णपणे बाहेर पडते. रक्तस्त्राव होऊन त्याच्या मांसातून रोग बरा होतो. म्हणून मुस्लिमांना झटक्याचे मांस खायला आवडत नाही.
Published on: 13 March 2025, 01:07 IST