सध्या भारतामध्ये कोरोना महामारी ची सुनामी चालू आहे. सगळीकडे मेडिकल ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. बऱ्याच दिवसापासून बातम्या येत आहेत की ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बरेच रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. ऑक्सिजनच्या सुयोग्य पुरवठ्यासाठी राज्य सरकार हे जंगजंग पछाडत आहे.
अशा परिस्थितीत ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर एक आशेचा किरण म्हणून समोर आहे. या सगळ्यामध्ये ऑक्सिजन कॉन्सेन्टरेटर म्हणजे काय? कोरोना रुग्णांसाठी एक वरदान आहे का? हे खरेदी करताना कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे? यासंबंधीची माहिती या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे.
ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर म्हणजे काय?
हे एक अशा प्रकारचे उपकरण आहे की ते वातावरणातील ऑक्सिजन वेगळे करून त्याचा पुरवठा करतो. फिलिप्स, इनवा केअर, इनोजेन, एयर सेप इत्यादी कंपनी ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर उपलब्ध करून देत आहे.
हे उपकरण घरी वापरता येते का?
या उपकरणाचा उपयोग घरात करता येतो. याला परत परत रिफील करावे लागत नाही. शिवाय याचा वापर करण्यासाठी कुठल्या वेगळ्या उपकरणाची आवश्यकता नसते.
कोरोनाच्या कुठल्या रुग्णासाठी हे उपकरण फायदेशीर आहे?
ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर ते गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी तेवढे फायदेशीर नाही कारण अशा रुग्णांना जास्त फ्लो च्या ऑक्सिजन ची आवश्यकता असते. आहे अशा रुग्णांसाठी फायदेशीर आहे तेजा रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा कमी आणि 90 पर्यंत आहे. जर एखाद्या वेळेसआवश्यक वेळेस ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नाही तर ज्या रुग्णांची ऑक्सिजन लेवल 85 आहे अशा रुग्णांसाठी ही वापर करता येतो.परंतु जर रुग्णांचे ऑक्सिजन लेव्हल 85 पेक्षा कमी असेल तर अशा रुग्णांना याचा फायदा होत नाही. अशा रुग्णांना सिलेंडर अथवा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन सपोर्ट ची आवश्यकता असते.
ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर किती प्रकारचे असतात?
याचे दोन प्रकार असतात. एका प्रकारांमध्ये ऑक्सिजनचा फ्लो एकसारखा आणि नियमित चालू राहतो जोपर्यंत आपण त्याला बंद करत नाही. दुसऱ्या प्रकारच्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मध्ये रुग्णांना जेवढ्या ऑक्सिजनची आवश्यकता असते त्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा वाढवता किंवा कमी करता येतो.
हे उपकरण एक मिनिटांमध्ये किती ऑक्सिजन देऊ शकता?
ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर वेगवेगळ्या क्षमतेचे असतात. जसे 3, 5, 8 आणि दहा लिटरच्या मिनिट ची रेंज मध्ये उपलब्ध आहे. म्हणजे एका मिनिटांमध्ये किती ऑक्सिजन पुरवठा होतो यावरही अवलंबून आहे. आता सगळ्यात जास्त चालणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर मध्ये तीन आणि पाच एल पी एम यांचा समावेश होतो.
भारतातल्या किमती
वेगवेगळ्या क्षमतेच्या कॉन्सेन्ट्रेटर ची किंमत वेगळी असते. ज्यांची क्षमता 5 एल पी एम आहे त्याची किंमत 40 ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे. दहा एल पी एम ची क्षमता असलेल्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर हे कमी ऑक्सिजनची गरज असलेल्या दोन रुग्णांसाठी वापरता येते. त्याची किंमत ही एक लाख 60 हजार रुपये आहे.
कोणते ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर चांगले असते?
यामध्ये ज्या ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर जे वजन 27 किलोपर्यंत असते ते चांगले मानले जातात. जे रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असतात अशा रुग्णांसाठी पाच एल पी एम चे ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर फायदेशीर असतात.
Published on: 03 May 2021, 10:53 IST